लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: घरी भाजी, पोळी तर नेहमीच खातो; परंतु खायला काही खमंग, रुचकर मिळाले तर औरच मजा येते. ही मजा घ्यायची असेल तर पॉलेटेक्निक ग्राउंडवर आयोजित कृषी महोत्सवामध्ये भेट द्या. या ठिकाणी खमंग भरीत, कळण्याची भाकर, मांडे, खर्रमखुर्रम रोडगे, त्याच्या चवीला ठेचा आदी पदार्थांनी खामगावकरांसाठी चांगलाच बेत आणला आहे. भोनगाव येथील नवनिर्माण महिला स्वयंसहाय्यता समूहाच्या संगीता लोणाग्रे, निर्मला पातुंडे, मनीषा पातुंडे, शारदा पातुंडे, भागीरथी भामोद्र, सविता भामोद्र यांनी मिळून मुगाचे धिरडे, कळण्याची भाकर, ठेचा, विविध प्रकारच्या चटण्या आणि सोबतीला सलाद उपलब्ध करून दिली आहे. त्यांच्या स्टॉलवर कळण्याची भाकर, ठेचा खाण्यासाठी चांगलीच गर्दी होत आहे.
#खामगाव कृषी महोत्सव : खमंग भरीत आणि कळण्याची भाकर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2018 1:40 AM
खामगाव: घरी भाजी, पोळी तर नेहमीच खातो; परंतु खायला काही खमंग, रुचकर मिळाले तर औरच मजा येते. ही मजा घ्यायची असेल तर पॉलेटेक्निक ग्राउंडवर आयोजित कृषी महोत्सवामध्ये भेट द्या. या ठिकाणी खमंग भरीत, कळण्याची भाकर, मांडे, खर्रमखुर्रम रोडगे, त्याच्या चवीला ठेचा आदी पदार्थांनी खामगावकरांसाठी चांगलाच बेत आणला आहे.
ठळक मुद्देखाद्यपदार्थांची नवलाई महिला बचतगटांना रोजगार