- ब्रम्हानंद जाधव
खामगाव : जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालयामार्फत कृषि महोत्सवामध्ये जिल्ह्यातील दर्जेदार व भरघोस उत्पादन घेणाºया शेतकऱ्यांनी पिकविलेले फळ, भाजीपाला यासह विविध प्रकारचे वाण प्रदर्शनीत मांडण्यात आले आहेत. यामध्ये माधुरी या वाणाच्या फुलकोबीचा दर्जा पाहून मुख्यमंत्र्यांनीही शनिवारला प्रदर्शनीच्या पाहणीदरम्यान या फुलकोबीविषयी माहिती जाणून घेतली. खामगाव येथे सुरू असलेल्या कृषि महोत्सवामध्ये जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालायाने जिल्ह्यात काही शेतकऱ्यां उत्पादीत केलेले फळ, भाजीपाला, फुले यासह विविध प्रकारच्या पीकांचे वाण या ठिकाणी ठेवण्यात आले होते. त्यामध्ये मुख्यमंत्र्यासह येणाºया प्रत्येकाचे लक्ष माधुरी वाणाच्या फुलकोबीने वेधले. खामगाव तालुक्यातील उल्हास निंबाजी दाभाडे या शेतकऱ्यांने ०.१० हेक्टर क्षेत्रावर माधुरी वाणाच्या फुलकोबीचे १.५० लक्ष रुपयांचे उत्पादन घेतले आहे. कमी कालावधीत भरघोस उत्पन्न या फुलकोबीतून मिळते. तसेच ही फुलकोबी आकाराने अत्यंत मोठी व दर्जेदार आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांनी स्वत: फुलकोबीची माहिती जाणून घेतली. तसेच चिखली तालुक्यातील शेलगाव आटोळ येथील रविंद्र प्रकाश सुरोशे यांनी पिकविलेली पपई, डोणगाव येथील पंचफुला जगदेवराव आखाडे यांनी पीकविलेली केळी, मोताळा तालुक्यातील सिंदखेड येथील दिलीप मोरे यांनी पाणकोबी, बुलडाणा तालुक्यातील चोंडोळ येथील मदानसिंग चांदा यांनी मोसंबी, डोणगाव येथील संतोष आखाडे यांनी संत्रा, मोताळा तालुक्यातील रोहिणखेड येथील सदाशिव गुजर यांनी टोमॅटो, लोणार तालुक्यातील सरस्वती येथील अनिल दुधमोगरे यांनी द्राक्ष, देऊळगाव राजा तालुक्यात खल्ल्याळ ग. येथील विठोबा दंदाले यांनी अंजिर, दुसरबीड येथील शे.अब्दुल शे.करीम यांनी शेवंती, गुलाब, बोथा येथील मदन दौलत बोराडे यांनी पपई, मेहकर येथील गणेश सौभागे यांनी शेवंती हे वाण प्रदर्शनात मांडले आहे. फळ, भाजीपाला, फुले आदी पिकांच्या या प्रदर्शनात जिल्ह्यातील विविध वाणाची माहिती शेतकºयांना मिळत असून, उत्कृष्ट वाण शेतकऱ्यां दिशादर्शक ठरत आहे.