- ब्रम्हानंद जाधव
खामगाव : महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागाकडून खामगाव येथील कृषि महोत्सवात लावण्यात आलेल्या स्टॉलमध्ये जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालयाकडून पाणलोट प्रकल्पाची प्रतीकृती निर्माण करण्यात आली आहे. जलयुक्त शिवार अभियानाचा संदेश देणाºया या पाणलोट प्रकल्पातून शेतीचा विकास कसा साधला जातो याचे वास्तव या उलगडले आहे. पाणी टंचाईची वाढती समस्या डोळ्यासमोर ठेवून महाराष्ट्र शासनाने विविध उपक्रम हाती घेतले आहेत. पाणी टंचाई मुक्त महाराष्ट्र घडविण्यासाठी जयलुक्त शिवार अभियानासारखे विविध उपक्रम राज्यात राबविले जात आहेत. जलयुक्त शिवार अभियानाचे महत्व शेतकºयांना पटवून देणारा देखावा जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालय बुलडाणाकडून खामगाव येथील कृषि महोत्सवात मांडण्यात आला आहे. या प्रदर्शनीमध्ये विकसीत पाणलोट व अविकसीत पाणलोट याचा जीवंत नमुनाच प्रशासनाने तयार केला आहे. त्यातुन विकसीत पाणलोटमुळे शेतीला होणारे फायदेही स्पष्ट केले आहेत. विकसीत पाणलोटमध्ये सामुहिक शेततळे, फुलशेती, फळबाग, भाजीपाला, मातीनाला बांध, उताराला आडवी पेरणी, ढाळीचे बांध, मागेल त्याला शेततळे, सलग समतल चर यासारख्या अनेक बाबींवर देखाव्याच्या माध्यमातून प्रकाश टाकण्यात आला आहे. तर अविकसीत पाणलोटच्या देखाव्यामध्ये कोरडे पडलेले बांध व दुष्काळसदृश परिस्थीतीचे चित्र दिसून येते. विकसीत व अविकसीत पाणलोटच्या या देखाव्यामुळे जलुयक्त शिवार अभियानाचे महत्व शेतकºयांना सहज समजून येते. प्रदर्शनात येणाºया शेतकºयांना पाणलोटचा हा देखावा आकर्षीत करत आहे.