खामगाव: खमंग, चमचमीत पदार्थ आणि सोबतीला रानगवऱ्यांमध्ये भाजलेले खरपूस रोडगे, मसालेदार वांग्याची भाजी...खांडोळी, मिरचीच्या भाजीचा आस्वाद...आणि सोबतच गृहोपयोगी वस्तूंच्या स्टॉलमुळे खामगावकरांची चांगली चंगळ झाली आहे. पॉलीटेक्नीक ग्राऊंडवरील कृषि महोत्सव शेतकºयांसाठी नाही, तर खामगावकरांसाठी एक पर्वणी ठरत आहे. महिला बचतगटांनी तयार केलेले मांडे, आवळा, खव्याची पुरणपोळी, चुलीवरची ज्वारी, बाजरीची भाकरी, खांडोळी, मिरचीची भाजी, पातोळीची भाजी सर्वांच्याच पसंतीस उतरली आहे.
#खामगाव कृषि महोत्सव : खरपूस रोडगे, खांडोळी, मिरचीच्या भाजीचा आस्वाद, अन् गृहोपगोयी वस्तूंची खरेदी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2018 3:52 PM
खामगाव: खमंग, चमचमीत पदार्थ आणि सोबतीला रानगवऱ्यांमध्ये भाजलेले खरपूस रोडगे, मसालेदार वांग्याची भाजी...खांडोळी, मिरचीच्या भाजीचा आस्वाद...आणि सोबतच गृहोपयोगी वस्तूंच्या स्टॉलमुळे खामगावकरांची चांगली चंगळ झाली आहे.
ठळक मुद्देवांग्याची भाजी...खांडोळी, मिरचीच्या भाजीचा आस्वाद...आणि सोबतच गृहोपयोगी वस्तूंच्या स्टॉलमुळे खामगावकरांची चांगली चंगळ झाली आहे. चुलीवरची ज्वारी, बाजरीची भाकरी, खांडोळी, मिरचीची भाजी, पातोळीची भाजी सर्वांच्याच पसंतीस उतरली आहे. ग्रामीण भागातील बचतगटांच्या महिलांनी लावलेल्या स्टॉलवरील खाद्यपदार्थांचा गंध आपसूकच शेतकरी, नागरिकांना आकर्षित करीत आहे.