लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: केळीचे उत्पादन घेताना, अन्नद्रव्याकडे लक्ष देणे महत्त्वाचे आहे. केळीची लागवड पाणी कमी असेल अशा एप्रिल ते मे महिन्याच्या कालावधीत करा. त्याचबरोबर अन्नद्रव्याच्या व्यवस्थापनाकडे विशेष लक्ष द्यावे, असे आवाहन राहुल भारंबे यांनी केले. ते स्थानिक कृषी महोत्सवामध्ये आयोजित मार्गदर्शन सत्रात ‘टिशू कल्चर तंत्रज्ञान’ या विषयावर बोलत होते. बगीचा स्वच्छ ठेवावा, शेतात पश्चिम व दक्षिण बाजूला वारा रोधक लावावे, असे आवाहन राहुल भारंबे यांनी केले. यावेळी कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी व शेतकरी उपस्थित होते.
#खामगाव कृषी महोत्सव : अन्नद्रव्याचे व्यवस्थापन महत्त्वाचे - राहुल भारंबे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2018 2:01 AM