लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: कपाशी पिकाची उंची वाढविण्यावर शेतकर्यांचा अधिक भर असतो; मात्र झाडाची उंची जेवढी जास्त तेवढे उत्पादन कमी. कपाशी झाडाची उंची ही चार फुटांपेक्षा जास्त नसावी, असे प्रतिपादन डॉ.बी.डी. जडे यांनी केले. कृषी महोत्सवामध्ये आयोजित मार्गदर्शन सत्रात ‘सुधारित कापूस लागवड तंत्रज्ञान’ या विषयावर ते बोलत होते. पुढे बोलताना डॉ. जडे म्हणाले की, सरकीचे वजन वाढविण्यासाठी जमिनीतील ओलावा व पौष्टिक घटक मिळणे महत्त्वाचे आहे. झाडाची उंची र्मयादित ठेवा, असे आवाहनही डॉ.बी.डी. जडे यांनी केले.
#खामगाव कृषी महोत्सव : कपाशीची उंची र्मयादित ठेवा - बी. डी. जडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2018 2:00 AM