शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
3
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
4
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
5
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
6
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
7
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
8
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
9
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
10
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
11
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
12
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
13
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
14
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
15
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
16
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
17
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
18
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
19
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
20
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती

#खामगाव कृषी महोत्सव : गटशेतीतून लाखोंची उलाढाल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2018 01:54 IST

खामगाव: नैसर्गिक आपत्ती, गारपीट, वाढत्या शेतकरी आत्महत्यांमुळे शेती  फायद्याची की तोट्याची, याची नेहमीच चर्चा होते; परंतु काही शेतकरी संकटावर  मात करून सकारात्मकतेने आधुनिक, सेंद्रिय पद्धतीने शेती करून कमी  खर्चामध्ये जास्त उत्पन्न घेत आहेत. वसंत बळीराम पाटील त्यापैकीच एक शे तकरी. त्यांनी गावातील २२ शेतकर्‍यांना संघटित करून गटशेतीचा प्रयोग सुरू  केला आणि पाहता-पाहता गटशेतीचे उत्पन्न ३५-४0 लाखांपर्यंत पोहोचविले. 

ठळक मुद्देशेतमाल थेट ग्राहकांपर्यंत सेंद्रिय शेती, बीजोत्पादन करून उन्नती

नितीन गव्हाळे। लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: नैसर्गिक आपत्ती, गारपीट, वाढत्या शेतकरी आत्महत्यांमुळे शेती  फायद्याची की तोट्याची, याची नेहमीच चर्चा होते; परंतु काही शेतकरी संकटावर  मात करून सकारात्मकतेने आधुनिक, सेंद्रिय पद्धतीने शेती करून कमी  खर्चामध्ये जास्त उत्पन्न घेत आहेत. वसंत बळीराम पाटील त्यापैकीच एक शेतकरी. त्यांनी गावातील २२ शेतकर्‍यांना संघटित करून गटशेतीचा प्रयोग सुरू  केला आणि पाहता-पाहता गटशेतीचे उत्पन्न ३५-४0 लाखांपर्यंत पोहोचविले. नांदुरा तालुक्यातील वडी गावचे राहणारे वसंत पाटील यांच्याकडे १५ एकर शेती.   सततची नापिकी, रासायनिक खतांचा वापर, कमी उत्पन्न यामुळे पाटील वैतागले.  त्यांनी शेतामध्ये प्रयोग करण्यास सुरुवात केली. कमी खर्चामध्ये आणि त्यात  सेंद्रिय पद्धतीने शेती करण्याचा प्रयत्न करीत, त्यांनी शेतात कडधान्ये, मिश्र पिके,  रब्बी पिके घेण्यास सुरुवात केली आणि विषमुक्त शेतामालावर प्रक्रिया करून  त्यांनी हा माल थेट ग्राहकांपर्यंत पोहोचविला. शेतमालाला मिळणारा अल्प  मोबदला, ऑनलाइन नोंदणीच्या प्रश्नातून त्यांनी स्वत:ची सुटका तर केलीच,  शिवाय गावातील २२ शेतकर्‍यांना एकत्र करून जय श्रीराम सेंद्रिय शेतकरी  स्वयंसहायता गट २0१६ मध्ये सुरू केला आणि १00 एकराची गटशेती  करण्यास सुरुवात केली. गटाचे अध्यक्ष गणेश घाटे पाटील, गटप्रमुख वसंत  पाटील यांनी शेतातील माल व्यापार्‍याकडे न देता, त्यांनी शेतकर्‍यांनाच उत्पादक ते  विक्रेता बनविले. राज्यभरातील अनेक शहरामध्ये सेंद्रिय पद्धतीने पिकवलेल्या शे तामालाची थेट विक्री होते. तूर, उडीद, मूग, तीळ, चना डाळ,  गूळ, गहू,  ज्वारीची विक्री करून दुप्पट नफा कमावितात.  १00 एकरातून  जय श्रीराम  सेंद्रिय शेतकरी स्वयंसहायता गटातील शेतकरी दरवर्षी ३५-४0 लाख रुपयांचे उत् पन्न मिळवितात.  त्यांनी केलेला गटशेतीचा प्रयोग विदर्भातील शेतकर्‍यांना कृषी  विकासाची दिशा देणारा आहे. 

कृषी अवजारे बँकेची निर्मितीकृषी महोत्सवामचे उद्घाटन करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कृषी  अवजारे बँकेस प्रोत्साहन देण्याचा शासनाचा विचार असल्याचे मत व्यक्त केले  होते; परंतु त्यापूर्वीच बुलडाणा तालुक्यातील सावळी व चांडोळ सर्कलमधील  सहा गावांमधील २९0 शेतकर्‍यांनी महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्पांतर्गत  चांडोळ फार्मस प्रोड्युसर कंपनी स्थापन केली. शेतकर्‍यांना बाजारपेठ मिळवून  देणे, उत्पादन खर्च कमी करणे, आधुनिक शेती, शेतमालाची प्रक्रिया करणे  आणि सेंद्रिय शेती करून बीजोत्पादन करण्यास सुरुवात केली. एवढेच नाही तर  या शेतकर्‍यांनी सामूहिक तत्त्वावर कृषी अवजारे बँक सुरू केली. या बँकेच्या  माध्यमातून शेतकर्‍यांना शेती मशागतीसाठी, शेतमाल प्रक्रियेसाठी यंत्र, शेती  अवजारे अल्प दरात उपलब्ध करण्यात येतात. 

टॅग्स :Khamgaon Agro Festivalखामगाव कृषि महोत्सव