खामगाव : पश्चिम विदर्भातील सर्वात मोठा कृषी महोत्सव शहरात सुरु आहे. या कृषी महोत्सवात शेतकºयांना आधुनिक तंत्रज्ञान व शेतीविषयक मार्गदर्शनासोबतच विविध सांस्कृतीक कार्यक्रम पार पडत आहेत. शिवजयंतीनिमित्त १९ फेब्रुवारीरोजी दुपारी १२ वाजता कृषी महोत्सवस्थळी कृषी व फलोत्पादनमंत्री ना. भाऊसाहेब फुंडकर यांनी हजेरी लावली. १६ फेब्रुवारी पासून जलंब रोडवरील पॉलीटेक्नीक ग्राऊंडवर भव्य कृषी महोत्सव सुरु आहे. सोमवारी दुपारी १२ वाजता हिंदवी स्वराज्याचे निमार्ते छत्रपती श्रीमंत शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी महाराष्ट्र राज्याचे कृषी व फलोत्पादन मंत्री तथा बुलडाणा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. भाऊसाहेब फुंडकर यांनी व खामगाव मतदार संघाचे आमदार अॅड. आकाश फुंडकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना माल्यार्पण करून अभिवादन केले. यावेळी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी प्रमोद लहाळे, प्रकल्प संचालक आत्मा नरेंद्र नाईक, तहसीलदार सुनिल पाटील, जिल्हा मृद चाचणी अधिकारी जे.एस.गायकवाड, भाजपाचे शहराध्यक्ष संजय शिनगारे, तालुका कृषी अधिकारी संजय ढाकणे, मंडळ कृषी अधिकारी अविनाश सूर्यवंशी, वरदा रांजणे, सोनाली सोनवणे, दीपक दहिफळे, ओंकार अय्यम, अनंता अंभोरे, कृषी सहाय्यक अमोल धामणकर, कल्पना गिरी, निवृत्ती नागे यांचे सह कृषी विभागातील कर्मचारी व शेतकरी बांधव मोठ्या संख्यने उपस्थित होते. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय जय भवानी जय शिवाजी या घोषणांनी परिसर दणदणुन गेला होता.
रांगोळी स्पर्धेत छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमाकृषि महोत्सवात आयोजित रांगोळी स्पर्धेला पॉलिटेक्नीक ग्राऊंडवर दुपारी २ वाजता सुरूवात झाली. रांगोळी स्पर्धेत शेकडो महिला, युवती, युवक उस्फूर्तपणे सहभागी झाले आहेत. स्पर्धेत छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा, बेटी बचाव, बेटी पढाओ, महिला सक्षमीकरण, शेती व शेतकरी, निसर्ग, पाणी बचतीचे महत्व आदी विषयांवर रंगीबेरंगी रांगोळी काढण्यात येत आहे.