लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : वाढत्या तापमानामुळे शहरात आगीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. मंगळवारी दुपारी येथील एमआयडीसी भागातील महावितरणच्या सबस्टेशनच्या आवारात अचानक आग लागल्याने महावितरणचे नुकसान झाले आहे. एमआयडीसी भागातील नांदुरा मार्गावरील महावितरणच्या सबस्टेशनमधील एका स्टोअरजवळील कचरा अचानक पेटल्याने आग लागली. आगीत कि ती नुकसान झाले, याची माहिती प्राप्त होऊ शकली नाही. सबस्टेशनमधील महावितरणच्या कर्मचार्यांनी तातडीने न.प.च्या अग्निशामक दलास माहिती दिली. यावेळी अग्निशामक दलाने घटनास्थळी पोहोचून कचर्याला लागलेली आग विझविली. महावितरणच्या अधिकार्यांनी पुढील अनर्थ टाळण्यासाठी सबस्टेशनवरील वीज पुरवठा बंद ठेवला होता. त्यामुळे दिवसभर नागरिकांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागला.
खामगाव : एमआयडीसीतील महावितरणच्या सबस्टेशनमध्ये आग!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2018 11:37 PM
खामगाव : वाढत्या तापमानामुळे शहरात आगीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. मंगळवारी दुपारी येथील एमआयडीसी भागातील महावितरणच्या सबस्टेशनच्या आवारात अचानक आग लागल्याने महावितरणचे नुकसान झाले आहे.
ठळक मुद्देवाढत्या तापमानामुळे शहरात आगीच्या घटनांमध्ये वाढ सबस्टेशनमधील कचरा अचानक पेटला