खामगाव : येथील नगर पालिका प्रशासनाकडून चालू आर्थिक वर्षांतील ४२ टक्के कराची वसुली करण्यात आली. ३१ डिसेंबर ही कराचा भरणा करण्यासाठी अंतिम मुदत असून, यातारखेनंतर कराचा भरणा केल्यास संबंधितांना २ टक्के शास्ती (दंड) भरावा लागणार असल्याचे दिसते.
नगर पालिका कर विभागाच्यावतीने सन २०१७-१८ या आर्थिक वर्षांसाठी १० कोटी ६६ लक्ष रुपयांचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे. वर्षांत ८ कोटी ५५ लक्ष रुपयांचे उद्दीष्ट ठेवले आहे. दरम्यान, गुरूवारपर्यंत नगर पालिका प्रशासनाकडे ४ कोटी २१ लक्ष रुपयांची कर वसुली झाली. दरम्यान, ३१ डिसेंबर ही कराचा भरणा करण्यासाठी शेवटची तारीख आहे. उद्दीष्ट पूर्तीच्या दृष्टीकोनातून पालिका प्रशासनाने उपाययोजना सुरू केल्या असून कर वसुलीसाठी संपूर्ण यंत्रणा कामाला लावली आहे. या कारवाईचा एक भाग म्हणून शहरातील मालमत्ताधारकांना मागणी पत्रांचे वितरण करण्यात आले. तसेच कराचा भरणा करण्यासाठी फेर सूचनाही दिली जात आहे.
अन्यथा लागणार शास्ती!
महाराष्ट्र नगर परिषद अधिनियम १९६५ कलम १५०(१) नुसार नागरिकांना नोटीस बजावण्यात आल्या असून, ३१ डिसेंबरपूर्वी मालमत्ता कराचा भरणे बंधनकारक करण्यात आले आहे. मुदतीच्या आत कराचा भरणा न करणाºयांना
दंडात्मक कारवाईही प्रस्तावित!
शहरातील बहुतांश मालमत्ता धारक आणि काही मोजक्या शासकीय कार्यालयांकडे गेल्या काही वर्षांपासून कर थकीत आहे. अशा मालमत्ता धारकांचे नळ कनेक्शन आणि इतर सुविधा बंद करण्यासोबतच दंडात्मक कारवाईही पालिका प्रशासनाकडून प्रस्तावित केल्या जाणार असल्याचे संकेत आहेत.
मालमत्ता जप्तीसोबतच, इतरही कायदेशीर कारवाई पासून सुटका करण्यासाठी, ३१ मार्चपर्यंत सर्व थकबाकीदारांनी थकीत कराचा भरणा करून पालिकेस सहकार्य करावे. उद्दीष्टपूर्तीसाठी विविध उपाययोजना पालिका प्रशासनाकडून केल्या जात असल्याने, कुणीही गाफील राहता कामा नये.
- धनंजय बोरीकर, मुख्याधिकारी, खामगाव.