खामगाव: रहदारीस अडथळा ठरणारे आणि रस्ता रूंदीकरणास बाधा पोहोचविणाºया अतिक्रमणावर खामगाव पालिकेच्यावतीने कारवाई केली जात आहे. या कारवाईमुळे नागरिक आणि पालिका कर्मचाºयांमध्ये वाद उद्भवत असून, बुधवारी दुपारी एका महिलेने अतिक्रमण हटविल्यास रॉकेल अंगावर घेण्याची धमकी दिली. त्यामुळे पालिकेच्या पथकाला आल्या पावली परतावे लागले. सोमवारी देखील नागरिकांच्या विरोधामुळे पालिकेची अतिक्रमण निमूर्लन मोहिम खोळंबली होती. शहरातील मुख्य रस्त्यासोबतच अंतर्गत रस्त्यांसोबतच पालिकेच्या मालकीच्या जागांवरील अतिक्रमण काढण्यासाठी पालिका प्रशासन सरसावले आहे. सोमवारपासून शहरातील विविध भागातील अतिक्रमण निमूर्लनास प्रारंभ करण्यात आला. यासाठी पालिकेने एक विशेष पथक गठीत केले आहे. दरम्यान, अतिक्रमण निर्मूलन मोहिम राबविताना नागरिकांच्या विरोधामुळे पालिका कर्मचाºयांची चांगलीच दमछाक होत आहे. सोमवारी वामन नगर आणि मुख्य बाजार पेठ रस्त्यांवर तणाव निर्माण झाल्याची घटना ताजी असतानाच, बुधवारी वामन नगरातील अतिक्रमण हटविताना पालिकेच्या पथकाला पुन्हा वादाला सामोरे जावे लागले. वारंवार सूचना देवूनही अतिक्रमण न काढणाºया नागरिकांच्या अतिक्रमणावर कारवाई करण्यापूर्वीच एका महिलेने अतिक्रमण काढल्यास ‘रॉकेल अंगावर’ घेवून आत्महत्या करण्याची धमकी दिली. त्यामुळे अतिक्रमण काढण्यासाठी गेलेले पथक रिकाम्या हाताने पालिकेत परतले. त्यानंतर पालिका प्रशासनाकडून अतिक्रमण निर्मूलन मोहिमेत खोडा घालणाºयांना नोटीसही बजावण्यात आल्या.
नोटीस स्वीकारण्यास टाळाटाळ!
अतिक्रमण न काढणाºया अतिक्रमकांना पालिकेने महाराष्ट्र नगर पालिका अधिनियम १९६५ चे कलम १७९, १८०, १८१ अन्वये २४ तासाच्या आत अतिक्रमण काढण्याची कायदेशीर नोटीस बुधवारी बजावली. मात्र, ही नोटीस घेण्यास सदर अतिक्रमकांनी स्पष्ट नकार दर्शविला. त्यामुळे आधी अतिक्रमण काढण्यास गेलेले पथक कारवाई न करताच परतले. त्यानंतर, नोटीस बजावणारे कर्मचाºयांनाही आल्या पावलीच परतावे लागले.
अतिक्रमकांची पालिकेत धडक!
आधी शहरातील सर्वच अतिक्रमण हटवा; त्यानंतरच आमचेही अतिक्रमण हटावा! असा पवित्रा घेत वामन नगरातील काही अतिक्रमकांनी थेट पालिका कार्यालय गाठले. अतिक्रमण निमूर्लनाल भेदभाव होत असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. मात्र, या अतिक्रमकांची मुख्याधिकाºयांशी भेट होवू शकली नाही. तथापि, कायदेशीर बाजू भक्कम केल्यानंतर या अतिक्रमकांचे अतिक्रमण हटविण्यात येणार असल्याचा दावा पालिका सुत्रांनी केला आहे.