खामगाव : शहरात उद्रेक झालेल्या ‘डेंग्यू’ आणि तत्सम साथरोगांना आळा घालण्यासाठी स्वच्छतेवर भर देण्याचे निर्देश नगराध्यक्षा अनिता डवरे यांनी दिले. शहरातील स्वच्छता आणि विविध आजाराच्या पार्श्वभूमीवर सोमवारी त्यांनी आरोग्य विभागाची दीर्घ बैठक घेतली.
गेल्या महिनाभराच्या कालावधीत ‘डेंग्यू’ आणि तत्सम साथ रोगाच्या पार्श्वभूमीवर शहरातील स्वच्छतेबाबत खबरदारी घेण्याच्या सूचनाही या बैठकीत करण्यात आल्या. यावेळी आरोग्य विभागाच्या विविध समस्यांचे निराकरणही पालिका प्रशासनाकडून करण्यात आले. या बैठकीला नगराध्यक्षा अनिता डवरे, आरोग्य सभापती हिरालाल बोर्डे, आरोग्य पर्यवेक्षक नीरज नाफडे, आरोग्य निरिक्षक अनंत निळे, सुनिल राजपूत, अहेरवाल यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी शहरातील स्वच्छतेत कसुर करणाºयांची गय केली जाणार नसल्याचेही पदाधिकारी, अधिकारी यांनी स्पष्ट केले.
शहरात जंतू नाशकांची फवारणी!
‘डेंग्यू’ आजाराच्या उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर शहरातील सर्वच वार्डात जंतू नाशकांची फवारणी करण्यात येत आहे. या फवारणीचा पहिला टप्पा संपुष्टात आला असून, दुसºया टप्प्याच्या फवारणीस मंगळवारपासून सुरूवात करण्यात आली. तसेच स्वच्छतेवरही भर दिला जात आहे.