- अनिल गवईलोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: स्थानिक नगर पालिकेतील नागरी दलितवस्ती योजनेंतर्गत उभारण्यात आलेल्या मिनी हायमास्टच्या निविदा प्रकरणी गुरूवारी चौकशीस प्रारंभ झाला. यामध्ये कंत्राटदारांच्या मोघम आणि अस्पष्ट उत्तरांमुळे पाच सदस्यीय समितीने कमालिचा संताप व्यक्त केला. कंत्राटदारानी दिलेल्या उडवा उडवीच्या उत्तरांमुळे समितीप्रमुखांसह सदस्यांनी यावेळी तीव्र नाराजी व्यक्त केल्याचा दावा सुत्रांनी केला. समितीच्या तटस्थ भूमिकेमुळे निविदा मॅनेज प्रकरण अनेकांच्या अंगलट येणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
नागरी दलितवस्ती योजनेतंर्गत विविध भागात मिनी हायमास्ट लावण्यासाठी एकाच कंत्राटदाराने २० कामांच्या पूरक निविदांसह ६० निविदा भरण्यात आल्याची तक्रार स्वीकृत नगरसेवक संदीप वर्मा यांनी केली. या तक्रारीच्या अनुषंगाने खामगाव पालिकेत स्पर्धात्मक निविदेला हरताळ फासण्यात आल्याचे उघडकीस आले. त्यामुळे या गंभीर प्रकाराच्या चौकशीसाठी मुख्याधिकारी धनंजय बोरीकर यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यीय समिती गठीत करण्यात आली. या समितीने गुरूवारी आपल्या चौकशीस सुरूवात केली. यामध्ये नगराध्यक्षा अनिता डवरे यांच्यासह मिनी हायमास्टच्या कंत्राटासाठी निविदा दाखल करणाºया तीन कंत्राटदारांसह तक्रारकर्ते नगरसेवक संदीप वर्मा यांनीही आपली बाजू मांडली. यावेळी कंत्राटदाराला लाभ पोहोचविण्यासाठी सत्ताधाºयांनी निविदा मॅनेज केल्याचा आरोप तक्रारकर्ते संदीप वर्मा यांनी केला. चौकशी समितीला सामोरे जाताना नगराध्यक्षा अनिता डवरे यांनी निविदा प्रक्रीया आॅनलाईन पध्दतीने असून, कोणीही आणि कुठेही दाखल करू शकतो. निविदा प्रक्रीयेतील पारदर्शकता समोर आणण्यासाठीच चौकशीसाठी आपणच पुढाकार घेतल्याचे समिती समोर स्पष्ट केले. त्यावेळी नगराध्यक्षांची बाजू खोडताना आॅनलाईन निविदा प्रक्रीया मॅनेज करण्याचा हा सर्वोत्तम नमुना असल्याची बाजू तक्रारकर्ते वर्मा यांनी समितीसमोर मांडली. याप्रकरणी लेखी खुलासे आणि खाते उतारे सादर करण्याचे निर्देश देत, चौकशी समितीने ही सुनावणी पुढील आठवड्यापर्यंत स्थगित केली. त्यामुळे याप्रकरणी आता पुढील आठवड्यात सुनावनी होणार असल्याचे समजते. दरम्यान, सदर प्रकरणी चौकशी सुरू असे पर्यंत कंत्राटदारांची देयके देऊ नयेत, असेही तक्रारकर्ते वर्मा यांनी समितीसमोर सुचविले.
एकाच कंत्राटदाराने भरली खात्यातून रक्कम!शहरातील २० ठिकाणी उभारण्यात येणाºया मिनी हायमास्ट लाईटचा कंत्राट मिळविण्यासाठी तीन पैकी एकाच कंत्राटदाराने स्वत:च्या खात्यातून रक्कम भरल्याचे चौकशी समितीसमोर उघड झाले. यावेळी उर्वरीत दोन कंत्राटदारांच्या संदिग्ध भूमिकेबाबत आक्षेपही चौकशी समितीने नोंदविले. चौकशी समितीमध्ये अध्यक्ष म्हणून मुख्याधिकारी धनंजय बोरीकर, उपमुख्याधिकारी रविंद्र सूर्यवंशी, विद्युत पर्यवेक्षक सतीश पुदाके, लेखापाल अक्षय जोरी, अंतर्गत लेखापाल आदित्य शिवेकर यांचा समावेश आहे.
निविदा प्रकरणी गंभीर स्वरूपाच्या तक्रारीला डावलून कार्यादेश देण्यात आला आहे. त्यामुळे नगराध्यक्षांच्या कार्यकाळातील विद्युत विभागात किती कामे निविदा बोलावून करण्यात आली. त्यापैकी किती कामाच्या निविदेत प्रकरणात असलेल्या तिन्ही कंत्राटदारांनी भाग घेतला आहे. चौथे निविदाकार का अपात्र ठरले? याची कामनिहाय माहिती प्रकरणाच्या अभिलेखावर घेण्यात यावी.- संदीप वर्मातक्रारकर्ता तथा स्वीकृत नगरसेवकखामगाव.