- अनिल गवईलोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: दीनदयाळ अंत्योदय योजना नागरी उपजिविका अभियानतंर्गत युनिसेफच्या आर्थिक मदतीने राबविल्या जाणाºया मास्क शिलाई आणि कोविड-१९ प्रतिबंधाबाबत जनजागृतीत खामगाव पालिकेने राज्यातील १५ नगर पालिकांमध्ये अव्वलस्थान पटकाविले आहे. त्याचप्रमाणे कोविड जनजागृती आणि महिला सक्षमीकरणातही खामगाव पालिका अग्रेसर ठरली आहे.मास्क शिलाई आणि कोविड-१९ जनजागृतीमध्ये राज्यातील १५ नगरपरिषदांमधील स्वयंसहाय्यता बचतगटांमधील सदस्यांच्या माध्यमातून राबविण्यात येत आहे. यामध्ये साधारण अडीच लाख मास्क तयार करणे व कोविड-१९ बाबत विविध जनजागृतीचे कार्यक्रम राबविण्यात येत आहे. प्रामुख्याने महिलांच्या कौशल्यामध्ये वाढ करणे, छोट्या उद्योग व्यवसाय चालू करण्यासाठी चालना देणे, आर्थिक व्यवहारांबाबत माहिती देणे, कोविड-१९ बाबत स्वत: सोबतच आपल्या कुटुंबाची व इतरांचीही काळजी घेणे, असा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. तसेच अभियानांतर्गत स्थापन करण्यात आलेल्या शहर स्तरीय संघांनाही या कार्यक्रमामधून आर्थिक मदत उपलब्ध झाली आहे, या संस्था शहरी गरिबांच्या सक्षमीकरणासाठी व उपजीविका विकासासाठी स्थापन करण्यात आल्या आहेत.
जनजागृती खामगाव पालिका अव्वल!खामगाव नगर परिषदेने याकामी विशेष पुढाकार घेऊन या कामाचा प्रगती अहवाल तयार करण्याच्या उद्देशाने ही छोटी फिल्म तयार केली आहे. तसेच मास्क निर्मिती आणि प्रशिक्षणात खामगाव पालिकेची उल्लेखनिय कामगिरी ठरत आहे.
खामगाव पालिकेचे अभियान व्यवस्थापक राजेश झनके यांच्यासह एनयुएलएम सेलमधील त्यांच्या प्रत्येक सहकाºयांनी उल्लेखनिय चित्र फित तयार केली आहे. ही राज्यातील पालिकांमध्ये हीट ठरत आहे.- मनोहर अकोटकरमुख्याधिकारी, नगर परिषद, खामगाव.
कोविड-१९ जनजागृतीबाबत खामगाव पालिकेचे मुख्याधिकारी एनयुएलएम सेलच्या अधिकारी आणि कर्मचाºयांनी विशेष प्रयत्न केले आहे. त्यांच्या या कामाचे राज्यातील इतर महापालिका आणि नगर पालिकांनीही अनुकरण करावे.-डॉ. किरण कुळकर्णीसंचालक तथा आयुक्तनगर परिषद प्रशासन संचालनालय, मुंबई.