खामगाव: सहा दिवसांपूर्वी घेतलेले स्वॅब नमुना अहवाल शुक्रवारी प्राप्त झाले. तब्बल सहा दिवसांनी प्राप्त झालेल्या अहवालात पालिकेतील ०७ कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. तत्पूर्वी याच आठवड्यात पालिकेतील ०३ कर्मचारी पॉझिटिव्ह आल्याने पालिकेतील कोरोना संसर्गाची रूग्णसंख्या दहावर पोहोचली आहे. तसेच ग्रामीण भागातील दोन तलाठीही पॉझिटीव्ह निघाले आहेत. दरम्यान, विलंबाने अहवाल प्राप्त झालेले सर्वच कर्मचारी अहवाल प्राप्त होईपर्यंत तब्बल ५ दिवस कर्तव्यावर होते. त्यामुळे पालिकेत एकच खळबळ उडाली आहे.कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि खबरदारी म्हणून खामगाव नगर पालिका प्रशासनाच्यावतीने रविवार २३ आॅगस्ट रोजी १३३ कर्मचाऱ्यांचे स्वॅब नमुने घेण्यात आले.रविवारी घेण्यात आलेल्या १३३ कर्मचाऱ्यांचे स्बॅब तपासणीसाठी नागपूर येथे पाठविण्यात आले. तर सोमवारी देखील १० कर्मचाºयांचे स्वॅब घेण्यात आले. यापैकी ०२ अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. सोमवारी घेण्यात आलेले अहवाल अकोला येथे पाठविण्यात आले. त्यामुळे हे अहवाल दोन दिवसांत प्राप्त झालेत.त्यामुळे कोरोना पॉझिटिव्ह आढळून आलेल्या दोन सफाई कामगारांना तात्काळ क्वारंटीन करण्यात आले. मात्र, नागपूर येथे पाठविण्यात आलेल्या सर्वच १३३ कर्मचाºयांचे स्वॅब नमुना अहवाल शुक्रवारी सकाळी प्राप्त झाले. यामध्ये ७ कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. शुक्रवारी अहवाल येईपर्यंत सर्वच सातही कर्मचाºयांमध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणं नसल्याने तब्बल ५ दिवस कर्तव्यावर होते. शुक्रवारी देखील यापैकी काही कर्मचारी अनेकांच्या संपर्कात आले. त्यामुळे पालिकेच्या विविध विभागात एकच खळबळ उडाली आहे.
कर्मचाºयांमध्ये धास्ती!कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या कर्मचाºयांच्या संपर्कात अनेकांनी तब्बल ५ दिवस काम केले. या कालावधीत पालिका आणि पालिकेच्या बाहेरील अनेकजण या कर्मचाºयांच्या संपर्कात आले. त्यामुळे अनेक कर्मचाºयांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. महिला कर्मचाºयांनी तर या प्रकाराची धास्तीच घेतल्याची चर्चा आहे.
पत्नीमुळे कर्मचाºयाला कोरोनाची लागण!्रपालिकेतील एका कर्मचाºयाची पत्नी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आली होती. पत्नीच्या हायरिस्क संपर्कात आलेल्या एका कर्मचाºयांमध्ये कोरोनाची लक्षणं आढळून आली. त्यामुळे या कर्मचाºयाची तपासणी केली. त्यामुळे हा कर्मचारीही कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला.
०६ सफाई कामगारांना लागणखामगाव नगर पालिकेतील तब्बल सहा सफाई कामगारांना कोरोनाची लागण झाल्याचे शुक्रवारी निष्पन्न झाले. उर्वरित चौघांमध्ये एका अधिकाºयासह ०३ कार्यालयीन कर्मचाºयाचा समावेश आहे.