लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : शहरातील दिव्यांगांना ह्यशक्तीह्ण देण्यासाठी खामगाव नगर पालिकेने पुढाकार घेतला असून दिव्यांग बेरोजगार, विद्यार्थी आणि दिव्यांग मुलींना लग्नासाठी खामगाव नगर पालिकेकडून आता अर्थसहाय्य मिळणार आहे. विविध तीन योजनांद्वारे दिव्यांगांना आर्थिक शक्ती देण्यासाठी पुढाकार घेणारी खामगाव नगर पालिका जिल्ह्यातील पहिलीच पालिका ठरत असल्याची चर्चा आहे. खामगाव नगर पालिका हद्दीतील दिव्यांगासाठी विविध तीन योजना नगर पालिकेने कार्यान्वित केल्या आहेत. यामध्ये बेरोजगार दिव्यांगासाठी १२०० रुपये प्रतिवर्ष बेरोजगारी भत्ता दिला जाणार आहे. त्याचप्रमाणे दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी ह्यलोकनेते कृषीरत्न स्व. भाऊसाहेब फुंडकर, खामगाव नगर परिषद दिव्यांग शक्तीह्णयोजनेतंर्गत २००० रुपये शिष्यवृत्ती योजना सुरू करण्यात आली आहे. तर दिव्यांग मुलीच्या लग्नासाठी अर्थसहाय्य म्हणून स्व. गोपीनाथ मुंढे, खामगाव नगर परिषद कन्यादान योजनाही पालिकेने कार्यान्वित केली असून कन्यादान योजनेतंर्गत ३० हजाराचे अर्थसहाय्य दिल्या जाणार आहे.
खामगाव पालिकेची दिव्यांगांना ‘शक्ती’!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 09, 2020 4:14 PM