लोकमत न्यूज नेटवर्कखामगांव : बुलढाणा जिल्हयात प्रथमच पश्चिम विदभार्तील शेतक-यांपर्यंत कृषि तंत्रज्ञान पोहोचविण्याचे दृष्टीने राज्याचे कृषी व फलोत्पादन मंत्री तथा बुलढाणा जिल्हयाचे पालकमंत्री भाऊसाहेब फुंडकर यांनी जिल्हा कृषि महोत्सव १६ ते २० फेब्रुवारी या कालावधीत खामगांव नगरीत आहे. या कृषी प्रदर्शनीचे जनजागृतीसाठी तयार करण्यात आलेल्या प्रचार रथांना ना. भाऊसाहेब फुंडकर यांनी हिरवी झेंडी दाखवली. आजपासून हा प्रचार रथ गावोगावी फिरणार आहे. महाराष्ट्र राज्यात भाजपा सरकार आल्यापासून शेतकºयांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे व त्याचे जीवनमान उंचविण्याचे प्रयत्न सुरु आहेत. त्यासाठीच संपुर्ण राज्यात कृषि महोत्सवांचे आयोजन करण्यात आले आहे. या कृषि महोत्सवात नवीन कृषि तंत्रज्ञान, अन्न प्रक्रीया उद्योग, सेंद्रीय शेती, वनौषधी वनस्पती, नवनवीन जातीचे बि-बियाणे, कृषि क्षेत्रातील यांत्रीकीकरण, कृषि संलग्न पुरक व्यवसाय, पशुपालन, फलोत्पादन आधारीत काढणी पश्चात तंत्रज्ञान, खाद्य पदार्थांचा आस्वाद, सांस्कृतिक कार्यक्रम असे भरपूर कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. या कृषी प्रदर्शनीची माहिती जिल्हयाभरातील सामान्य शेतक-यांना व्हावी या दृष्टीने हा प्रचार रथ फिरत आहे. यावेळी आमदार अॅड. आकाश फुंडकर, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी प्रमोद लहाळे, आत्माचे प्रकल्प संचालक नाईक आदी उपस्थित होते.
खामगावात कृषी महोत्सवाची प्रचार रथाव्दारे जनजागृती!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2018 00:59 IST
खामगांव : बुलढाणा जिल्हयात प्रथमच पश्चिम विदभार्तील शेतक-यांपर्यंत कृषि तंत्रज्ञान पोहोचविण्याचे दृष्टीने राज्याचे कृषी व फलोत्पादन मंत्री तथा बुलढाणा जिल्हयाचे पालकमंत्री भाऊसाहेब फुंडकर यांनी जिल्हा कृषि महोत्सव १६ ते २० फेब्रुवारी या कालावधीत खामगांव नगरीत आहे. या कृषी प्रदर्शनीचे जनजागृतीसाठी तयार करण्यात आलेल्या प्रचार रथांना ना.भाऊसाहेब फुंडकर यांनी हिरवी झेंडी दाखवली.
खामगावात कृषी महोत्सवाची प्रचार रथाव्दारे जनजागृती!
ठळक मुद्देना. भाऊसाहेब फुंडकर यांनी दाखविली हिरवी झेंडी शेतक-यांपर्यंत कृषि तंत्रज्ञान पोहोचविण्याचे दृष्टीने हा प्रचार रथ गावोगावी फिरणार आहे