शहरं
Join us  
Trending Stories
1
माझ्याकडे महाराष्ट्राचे सत्यात उतरणारे स्वप्न, माझा कम्फर्ट भाजपसोबत; राज ठाकरेंनी मांडली रोखठोक भूमिका
2
मराठा समाजाची कांड्यांवर मोजण्याइतकी आहेत मतं; भाजपच्या बबनराव लोणीकरांचे वादग्रस्त वक्तव्य
3
शिवाजी पार्कवर उद्धवसेना, मनसेची सभा होणार?; नगरविकास खात्याच्या निर्णयाकडे लक्ष
4
जगातले दुश्मन एकत्र येतात तर आम्ही एकत्र येण्यावर चर्चा तर हवी; 'लोकमत'च्या मुलाखतीत राज ठाकरेंचं वक्तव्य
5
भाजपच्या बंडखोर उमेदवाराचा शिंदेसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा
6
उठा उठा थंडी आली, स्वेटर घालायची वेळ झाली; मुंबई २० अंशांवर, राज्यात थंडीचा कडाका होतोय सुरू!
7
२ हजारांहून अधिक मतदार सध्या कामानिमित्त परदेशात
8
दिव्यांग, ज्येष्ठांना मतदानाला आणण्यासाठी विशेष सोय; सक्षम ॲपवर नाव नोंदवण्याचे आवाहन
9
"कुणाला काय विचारावं हे पण उद्धव ठाकरेंना माहिती नाही"; राज ठाकरेंची बोचरी टीका
10
"जेव्हा-जेव्हा हिंदूंमध्ये फूट पडली, तेव्हा-तेव्हा देशाचा एक भाग वेगळा झाला"; 'बटेंगे तो कटेंगे'वर शेखावत थेटच बोलले
11
भाजपच्या सभेत मिथुन चक्रवर्तींचे पाकिट चोरले; स्थानिक नेत्यांची चोराला अपील, व्हिडिओ व्हायरल
12
"५ वर्षापूर्वी अमित शाह, शरद पवार अन् गौतम अदानी..."; अजित पवारांचा गौप्यस्फोट
13
“उद्धव ठाकरेंच्या बॅगेत असे काय आहे? एवढी आगपाखड करायचे कारण काय?”; शिंदे गटाने डिवचले
14
"समजूत काढायला गेले अन् तिथेच बसले"; येवल्यात भुजबळांवर शरद पवारांचा हल्लाबोल
15
Shocking! एक कार शेकडोंच्या गर्दीत घुसली; 35 जणांचा मृत्यू, ४३ जखमी, ड्रायव्हर कोमात
16
डोनाल्ड ट्रम्प यांनी कुणाला बनवलं NSA? नाव जाणून पाकिस्तानलाही धढकी भरेल; भारतासाठी आहेत खास!
17
किरकोळ महागाई RBI च्या हाताबाहेर गेली; रेपो रेटमध्ये कपात होणे शक्य नाही?
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मुख्यमंत्रिपदावरुन महाविकास आघाडीमध्ये वाद? उद्धव ठाकरेंनी एका शब्दात विषयच संपवला
19
महाराष्ट्रातील निवडणुकीसाठी काँग्रेसचा 'मेगा प्लॅन'! पुढच्या ६ दिवसांत काय करणार? २ गोष्टींवर असेल सर्वधिक फोकस
20
“मविआ सत्तेत आल्यास शेतकरी कर्जमाफी, महिलांना खटाखट ३ हजार देऊ”; राहुल गांधींची गॅरंटी

खामगाव-शेगाव दिंडी मार्गावर उसळली 'भक्ती'ची लाट!

By अनिल गवई | Published: August 11, 2024 12:10 PM

श्रींची पालखी रविवारी सकाळी पोहोचली शेगावात : पालखी सोबत असलेल्या भाविकांचे ठिकठिकाणी स्वागत

खामगाव : शनिवारी सायंकाळी खामगावात मुक्कामी आलेल्या शेगावीच्या राणांच्या पालखीने रविवारी पहाटे ४:५० वाजता विदर्भ पंढरी शेगावच्या दिशेने प्रस्थान केले. विदर्भ पंढरीनाथाला श्रध्देचा निरोप देण्यासाठी शनिवारपासूनच खामगाव शहरच नव्हे तर बुलढाणा जिल्ह्यासह आसपासच्या जिल्ह्यातील भाविकांची लगबग सुरू होती. खामगावातील वाड्या वस्त्या पहाटे लवकरच जागे झाल्या. आबालवृध्द, महिला आपल्या चिल्या पिल्यांसह दिंडी मार्गाला लागल्या. रिपरिप पावसाची किंचितही तमा न बाळगता हजारो भाविक पालखी सोबत शेगावात दाखल झाले. त्यामुळे दिंडी मार्गावर भक्तीची लाट उसळल्याचे दिसून आले.

खामगावातून निघालेली श्रींची पालखी शेगावातील नवोदय विद्यालयाजवळ सकाळी ९:२७ वाजता पोहोचली. श्रींची पालखी शेगावात दाखल झाल्यानंतर तब्बल साडेतीन तास दिंडी मार्गावरील वर्दळ कायम होती. श्रींच्या पालखीच्या एक ते दीड तास अगोदर सकाळी ८:४७ वाजता भाविकांची पहिली तुकडी शेगावात दाखल झाली. त्यांच्या पाठोपाठ आणखी काही भाविकही पोहोचले. त्यानंतर आषाढी एकादशीची पंढरपूर वारी करून श्रींची पालखी शेगावात दाखल झाली. त्यावेळी श्री गजानन महाराज संस्थान, प्रशासकीय व्यवस्थेसोबतच भाविकांनी 'ज्ञानोबा माउली तुकाराम, गण गणात बोते'चा जयघोष करीत पालखीचे स्वागत झाले. 

अकोला, बुलढाणा, वाशिम जिल्ह्यातील नव्हेतर जळगाव खान्देश, जालना आणि अमरावती येथील भाविकांनी आपली वाहने खामगाव येथे उभी करून खामगाव ते शेगाव पायदळ वारी केली. भर पावसातही भाविकांची गर्दी वाढती असल्याने दिंडी मार्गावर रविवारी केवळ भक्तीचा माहोल असल्याचे दिसून आले. श्रींच्या पालखी सोबतच सुमारे एक लाख भाविकांनी पायदळ प्रवास केल्याचा दावा केला जात आहे.

पालखींचे ठिकठिकाणी स्वागतश्री गजानन महाराजांच्या पालखी सोबत जाणाऱ्या हजारो भाविकांसाठी ठिकठिकाणी चहा, नास्ता, फराळ, जेवण आणि निशुल्क औषध वितरण करण्यात आले. त्याचवेळी विविध सामाजिक संघटनांच्या वतीने स्वच्छता सेवा केली.

दिंडी मार्गावर बंदोबस्तपालखीसोबतच भाविकांच्या सुरक्षेची ही काळजी यावेळी पोलिस प्रशासनाच्या वतीने घेण्यात आली. रविवारी दुपारी ३ वाजता पर्यंत हा मार्ग बंद होता. खामगाव, शेगाव पोलीसांचे पथक तैनात होते.

टॅग्स :buldhanaबुलडाणा