- अनिल गवईलोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : शहर विकासासाठी महत्वाकांक्षी असलेल्या दोन महत्वपूर्ण योजना पूर्णत्वास नेण्यासाठी पालिका प्रशासनाचे प्रयत्न राहणार आहेत. घनकचरा व्यवस्थापनाचा तिढा नव्या वर्षात सुटणार असल्याचे संकेत असून, पंतप्रधान आवास योजनाही मार्गी लागेल. याशिवाय वाढीव पाणी पुरवठा योजना पुर्णत्वास नेण्यासाठी पालिकेचे प्रयत्न असणार आहेत.बुलडाणा जिल्ह्यातील आबाद १२७२ गावांपैकी (खेडी आणि शहरे) २४ गावांमध्ये पेस्टीसाईटचे प्रमाण जास्त आढळून आले आहे. परिणामी, जिल्ह्यातील सर्वच गावांमध्ये घनकचरा व्यवस्थापनावर भर दिल्या जात आहे. स्वच्छ सर्व्हेक्षणातंर्गत खामगाव शहरासाठी ६०० कोटी रुपयांचा डीपीआर मंजूर केला आहे. (डेव्हलपमेंट प्रोजेक्ट रिपोर्टनुसार खामगाव शहरासाठी ३३ तीन चाकी तर २० चारचाकी गाड्या प्राप्त झाल्या आहेत.तर घनकचरा व्यवस्थापनासाठी साईट डेव्हलपमेंटचे कामही प्रगतीपथावर आहे. त्यामुळे आगामी वर्षांत घनकचरा व्यवस्थानाचा प्रश्न मार्गी लागणार असल्याचे संकेत आहेत. त्याचवेळी खामगाव शहरासाठीची वाढीव पाणी पुरवठा योजना मार्गी लागणार असल्याचे पालिकेचे प्रयत्न आहेत.पंतप्रधान आवास योजनेला मिळणार गती !पंतप्रधान आवास योजनेतंर्गत शासनाकडून खामगाव पालिकेला सन २०२१-२२ पर्यंत ३५१९ घरांचे उद्दीष्ट देण्यात आले आहे. त्यानुसार शहरातील सहा हजारावर घरांचे सर्वेक्षण करून १४९५ लाभार्थ्यांच्या परिपूर्ण अर्जाचे ७ डिपीआर महाराष्ट्र शासन गृहनिर्माण विभाग (म्हाडाकडे) सादर करण्यात आले आहेत. शासनस्तरावर घरकुलांचा प्रस्ताव प्रलंबित होता. या प्रस्तावाला मान्यता देण्यासाठी आता शासन स्तरावरून प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून नेमण्यात येणार आहे. त्यासंबधीत ठरावही खामगाव पालिकेत घेण्यात आला. त्यामुळे म्हाडाकडून ‘केपीएमजी’ या प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला आहे. आगामी वर्षांत खामगाव शहरातील १४९५ घरकुलांची योजना पुर्णत्वास जाणार असल्याचे शुभसंकेत आहेत.
खामगाव : घनकचरा व्यवस्थापन आणि घरकुल योजना जाणार पुर्णत्वास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 01, 2020 2:25 PM