ठळक मुद्देउपचारादरम्यान गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याने नातेवाइकांनी केली हो ती तोडफोड
लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: येथील उपजिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता कक्षाच्या तोडफोडप्रकरणी चौघा जणांविरोधात मंगळवारी उशिरा रात्री गुन्हा दाखल करण्यात आला. गर्भवती महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानंतर नातेवाइकांनी डॉक्टरांना मारहाण करीत मंगळवारी तोडफोड केली होती.स्थानिक शासकीय उपजिल्हा रुग्णालयात शेगाव तालुक्यातील आडसुळ येथील मनिषा कंकाळ या गर्भवती महिलेचा मंगळवारी सायंकाळी मृत्यू झाला होता. तिच्या नातेवाइकांनी त्यामुळे तोडफोड केली होती. डॉ. सचिन गाडेकर यांनाही मारहाण झाली होती. प्रकरणी डॉ. गाडेकर यांच्या तक्रारीवरून शहर पोलिसांनी एकनाथ कंकाळ, त्याचा भाऊ व अन्य दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तपास पीएसआय ठाकूर करीत आहेत.