लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: शहरातील पाणी पुरवठा सुरळीत करण्याची मागणी जिल्हा शासकीय नळपाणी पुरवठा भ्रष्टाचार निमूर्लन समि तीच्यावतीने बुधवारी पालिका प्रशासनाकडे करण्यात आली. यावेळी पालिका सभागृहात पार पडलेल्या बैठकीत शहराचा पाणी पुरवठा नियमित करण्याचे आश्वासन प्रशासनाने समि तीला दिले.खामगाव शहरात वारंवार पाणी पुरवठा विस्कळीत होत असून, धरणात पुरेसा साठा असतानाही दहा दिवस पाणी पुरवठा करण्यात येत नसल्याच्या तक्रारीवरून नळपाणी पुरवठा भ्रष्टाचार निमूर्लन समितीच्यावतीने समितीचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी मंत्री सुबोध सावजी, समितीचे विधानसभा प्रमुख संजय ठाकरे पाटील यांच्या नेतृत्वात बुधवारी पालिकेवर धडक देण्यात आली. यावेळी नगराध्यक्ष अनिताताई डवरे, मु ख्याधिकारी धनंजय बोरीकर, उपाध्यक्ष संजय मुन्ना पुरवार, पाणी पुरवठा सभापती सतीशआप्पा दुडे, नगरसेवक संदीप वर्मा, ओम शर्मा, गणेश जाधव, वैभव डवरे, पाणी पुरवठा अभियंता नीरज नाफडे, राकेश जाधव, सुरजसिंह ठाकूर, संतोष फरकाळे, वानखडे यांनी समितीच्या पदाधिकार्यांचे स्वागत केले. यावेळी शहरातील स्वच्छ पाणी पुरवठय़ाबाबत समितीच्या पदाधिकार्यांनी प्रशासनाचे स्वागत केले. मात्र, लांबणीवरील पाणी पुरवठय़ाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. दरम्यान, पालिका प्रशासन, सत्ताधारी आणि समितीच्या पदाधिकार्यांमध्ये झालेल्या चर्चेअंती प्रशासनाने नियमित पाणी पुरवठा करण्याचे आश्वासन दिले. समितीचे विधानसभा प्रमुख संजय ठाकरे पाटील यांनी ही भेट घडवून आणली. यावेळी समितीचे तालुका अध्यक्ष अँड. श्यामल गायगोळ, संजय उन्हाळे, दत्ता शिंदे, प्रा. सुर्वे, सुधीर पाटील, तारापुरे, दामोदर ताठे आदींचीउपस्थिती हो ती.
पाणी पुरवठा योजनांमधील भ्रष्टाचार खणून काढणार!खामगाव मतदार संघातील शुक्ल नगर सुटाळा खुर्द, जळका भंडग आणि हिवरा येथील पाणी पुरवठा योजनेत झालेल्या भ्रष्टाचाराचे कागदोपत्री पुरावे मुख्य सचिव मलीक, पाणी पुरवठा सचिव यांच्याकडे सादर करण्यात आले आहेत. यासंदर्भात मुख्य सचिवांनी जिल्हाधिकार्यांशी व्हिडीओ कॉन्फरसींगद्वारे चर्चाही केली आहे. त्यामुळे पाणी पुरवठा योजनेतील भ्रष्टाचार करणार्या विरोधात गुन्हे दाखल होण्याचा मार्ग मोकळा झाला असून, पाणी पुरवठा योजनांतील भ्रष्टाचार खणून काढल्याशिवाय स्वस्थ बसणार नसल्याचा इशारा यावेळी समि तीचे विधानसभा प्रमुख संजय ठाकरे पाटील यांनी दिला.
पालकमंत्र्यांनी दिल्या सत्ताधार्यांना उपस्थितीच्या सूचनाजिल्हा शासकीय नळपाणी पुरवठा भ्रष्टाचार निमूर्लन समितीचे संस्थापक तथा माजी मंत्री सुबोध सावजी तथा विधानसभा प्रमुख संजय ठाकरे पाटील यांच्यासह समितीच्या पदाधिकार्यांच्या प्रशासकीय बैठकीच्या वेळी भाजप पदाधिकार्यांनी न चुकता उ पस्थित रहावे, अशा सूचना राज्याचे कृषी तथा फलोत्पादन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. भाऊसाहेब फुंडकर यांनी दिल्या. अशी माहिती उपाध्यक्ष संजय मुन्ना पुरवार यांनी समितीच्या सभेत दिली. यावेळी माजी मंत्री सुबोध सावजी आणि संजय ठाकरे पाटील यांचा सत्ताधारी आणि प्रशासनाकडून सत्कारही करण्यात आला.
त्यांना पाणी टंचाईचे गांभीर्य नाही का!जिल्हा शासकीय नळपाणी पुरवठा भ्रष्टाचार निमूर्लन समितीचे संस्थापक तथा माजी मंत्री सुबोध सावजी तथा विधानसभा प्रमुख संजय ठाकरे पाटील काँग्रेस पक्षाशी निगडीत असल्याचा प्रश्न नगरसेवक गणेश जाधव यांनी उपस्थित केला. आपल्या सोबत काँग्रेसचा एकही नगरसेवक का नाही? असा प्रश्न उपस्थित करून, त्यांना पाणी टंचाईचे गांभीर्य नाही का? असा प्रतिप्रश्नही जाधव यांनी उपस्थित केल्याने, सभागृहातील वातावरण काही काळ तणावपूर्ण झाले होते.
जिल्ह्यातील पाणी पुरवठा योजनामध्ये नियमितता आणण्यासाठी आपण कटीबध्द आहोत. खामगाव पालिकेने पाणी पुरवठा नियमित करावा, एवढीच अपेक्षा आहे. स्वच्छ पाणी पुरवठय़ाबद्दल ते निश्चितच अभिनंदनास पात्र आहेत.- सुबोध सावजीसंस्थापक अध्यक्ष, पाणी पुरवठा भ्रष्टाचार निमूर्लन समिती