- अनिल गवईखामगाव: स्वच्छ भारत अभियानातंर्गत स्वच्छ सर्वेक्षण मोहिमेद्वारे होत असलेल्या जागृतीचा सकारात्मक परिणाम खामगावकरांवर होत असल्याचे चित्र आहे. स्वच्छ सर्वेक्षणात विद्यार्थी, सामाजिक संस्थांसोबतच नागरिकांचाही सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याने, खामगाव पालिकेने स्वच्छता अॅप डाऊनलोडींगमध्ये उल्लेखनिय आघाडी घेतली आहे.स्वच्छ भारत अभियानाच्या धरतीवर राज्यात स्वच्छ महाराष्ट्र अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानातंर्गत राज्यातील विविध शहरांमध्ये ‘स्वच्छ सर्वेक्षण’ मोहिम राबविण्यात येत आहे. नागरिकांच्या सहभागामुळे या सर्वेक्षण महत्वाचे मानले जात असतानाच, नागरिकांचा ‘फिडबॅक’ हा या सर्वेक्षणाचा महत्वपूर्ण घटक बनला आहे. परिणामी, पालिका प्रशासनाकडून नागरिकांच्या सकारात्मक प्रतिसादासाठी प्रयत्न केले जात आहेत. दरम्यान, विविध उपाययोजनाही पालिका प्रशासनाकडून केल्या जात आहेत. यामध्ये स्वच्छता अॅप डाऊनलोडींग सोबतच जनजागृतीचाही समावेश असून, भावनात्मक प्रतिसादासाठी ‘स्वच्छता भूत’ अधोरेखीत केले आहे. स्वच्छता आमच्या डोक्यात भीनल्याचे दर्शविण्यासाठी ‘स्वच्छतेचे भूत’ फलकांवर रंगविण्यात येत आहे. तसेच ‘स्वच्छता अॅप’ डाऊनलोडींग करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
स्वच्छ भारत का इरादा, इरादा कर लिया हमने! स्वच्छ सर्वेक्षणाचे उद्दीष्ट पूर्ण करण्यासाठी तसेच कचरामुक्त शहराची संकल्पना अंमलात आणण्यासाठी खामगाव पालिकेच्यावतीने सकाळ आणि संध्याकाळ घंटागाडी सुरू करण्यात आली आहे. ‘स्वच्छ भारत का इरादा, इरादा करने लिया हमने’ या घोषवाक्याद्वारे शहरातील कचरा निमुर्लन करण्यात येत आहे. सकाळ-संध्याकाळ घंटागाडी फिरविणारी खामगाव पालिका ही एकमेव पालिका ठरली आहे.
६३ टक्के उद्दीष्टपूर्ण!खामगाव शहरासाठी सुरूवातीला अॅप डाऊनलोडींगसाठी निश्चित करण्यात आलेल्या उद्दीष्टाच्या ६३ टक्क्यांपर्यंत पालिका पोहोचली आहे. यामध्ये १११९ अँड्रॉईड मोबाईल धारकांनी तसेच ०९ (आयओएस) सिस्टीम मोबाईल धारकांनी अॅप डाऊनलोड केले आहे. त्यामुळे स्वच्छता अॅप डाऊनलोडींगचे ६३ टक्के उद्दीष्ट पूर्ण झाले आहे.
शाळा-महाविद्यालयांना पत्र !स्वच्छ सर्वेक्षणातंर्गत शहरातील स्वच्छता अबाधित ठेवण्यासाठी पालिका प्रशासनाकडून शाळा- महाविद्यालयांना स्वच्छता अभियानात सहभाग नोंदविण्यासाठी शहरातील सामाजिक संस्था, शाळा, तसेच महाविद्यालयांना पत्र देण्यात येत आहे.