लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : येथील उप-जिल्हा रुग्णालयातून पाच दिवसाच्या बाळास एका बुरखाधारी महिलेने पळवून नेल्याची खळबळजनक घटना बुधवारी मध्यरात्री तीन वाजेच्या सुमारास घडली. सदर महिला एका कारमधून आली व तिने वॉर्डातून बाळ उचलून पलायन केल्याची ही घटना सीसी कॅमेर्यात कैद झाली आहे. वडनेर भोलजी येथील सुमय्या परवीन आसीफ खान (२२) या महिलेने येथील उप-जिल्हा सामान्य रुग्णालयात पाच दिवसां पूर्वी बाळाला जन्म दिला. वार्ड क्रमांक ५ मध्ये सदर महिला झो पेत असताना रात्री तीन वाजेच्या सुमारास एका बुरखाधारी महिलेने प्रवेश केला. सर्व सामसूम असल्याचे लक्षात आल्यानं तर तिने सुमय्या परवीन यांच्या बाळाला पिशवीत टाकले व पलायन केले. सुमय्या यांना जाग आल्यानंतर बाळ जागेवर दिसले नसल्याने त्यांनी चौकशी केली, तेव्हा हा प्रकार उघडकीस आला. हा संपूर्ण घटनाक्रम सीसी कॅमेर्यात कैद झाला आहे. घटनेची माहिती मिळताच रुग्णालय अधीक्षक तसेच पोलिसांनी सामान्य रुग्णालयात धाव घेतली. फुटेज तपासण्यात आल्यानंतर बुरखाधारी महिलेने सदर बाळाला एका कारमधून पळवून नेल्याचे स्पष्ट झाले. या फुटेजच्या आधारे पोलिसांनी बाळाचा शोध सुरू केला आहे. याप्रकरणी सुमय्या परवीन यांचे वडील अय्युबखान युसूफखान (५0) यांच्या तक्रारीवरून महिलेविरोधात कलम ३६३, ३४ भादंविनुसार गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, पोलिसांनी पुरूषोत्तम काळे या सुरक्षा रक्षकाला ताब्यात घे तले आहे.
पूर्वनियोजित कट !रात्री तीनच्या सुमारास कारमधून येणे, वॉर्ड नं. ५ मध्ये पोहोचून सुमय्या यांचे बाळ सफाईदारपणे पळवून नेण्याचा हा प्रकार पाह ता तो पूर्वनियोजित कट असल्याची शक्यता सूत्रांनी वर्तविली आहे. रुग्णालय परिसरात पूर्ववैमनस्यातून हा प्रकार घडला असावा, अशीही दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे. बाळाचा शोध लावण्याचे पोलिसांसमोर मोठे आव्हान असून, पोलीस सर्व बाजूने चौकशी करीत आहेत.