लोकमत न्यूज नेटवर्कवरवट बकाल: तालुक्यातील पातुर्डा बु. येथे २८ वर्षीय युवकाचा किडनीच्या आजाराने १८ नोव्हेंबर रोजी मृत्यू झाला. मृत युवकाचे नाव प्रमोद पांडुरंग बोपले (वय २८) असे आहे. प्रमोदच्या घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. त्यात किडनी आजार झाल्याचे चाचणीत निष्पन्न झाल्याने कुटुंबाने अकोला येथे खासगी रुग्णालयात उपचारार्थ भरती केले. बोपले कुटुंबाकडे दीड एकर शेती असून त्यांनी औषधोपचारावर बराच खर्च केला; परंतु उपयोग झाला नाही. तालुक्यात किडनी आजारामुळे पातुर्डा, कोद्री कुंदेगाव, बोडखा, वरवट खंडेराव, वरवट बकाल, पळशी झाशी, संग्रामपूर, कलमखेड, कवठळ आदी गावातील अनेकांचा बळी गेला आहे; परंतु शासनाकडून आरोग्य विभागामार्फत ठोस उपाययोजनेसाठी योग्य पाऊल उचलण्यात न आल्याने किडनी विकाराने मृत्यू झालेल्या व किडनी आजारावर खर्च करून आर्थिक संकटात सापडलेल्या संबंधित रुग्णांच्या कुटुंबांत शासनाविरुद्ध तीव्र नाराजीचा सूर उमटत आहे.
किडनी आजाराने घेतला युवकाचा बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2017 12:59 AM
वरवट बकाल: तालुक्यातील पातुर्डा बु. येथे २८ वर्षीय युवकाचा किडनीच्या आजाराने १८ नोव्हेंबर रोजी मृत्यू झाला. मृत युवकाचे नाव प्रमोद पांडुरंग बोपले (वय २८) असे आहे.
ठळक मुद्देमृत युवकाचे नाव प्रमोद पांडुरंग बोपलेकिडनी आजारामुळे तालुक्यात अनेकांचा गेला बळी