सिंदखेड राजा तालुक्यातील सोयंदेव येथे शिवनारायण दत्तात्रय नागरे यांच्या विहिरीवरील मोटारपंप चोरीला गेला होता. या प्रकरणी तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपी विरोधात १५ सप्टेंबर रोजी तक्रार दाखल केली होती. दरम्यान, ठाणेदार युवराज रबडे यांनी सोयंदेव, रुम्हणा, जंभोरा, सोनोशी, चांगेफळ परिसरात गोपनीय माहिती माहिती गोळा करत, राजीव खरात यास ताब्यात घेत त्याची विचारपूस गेली. दरम्यान, त्यानेच मोटारपंप चोरल्याची खात्री झाल्यानंतर पोलिसांनी त्यास ताब्यात घेत, न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली. दरम्यान, आरोपी विहिरीवरून चोरेलली ११ हजार ५०० रुपयांचे दोन मोटारपंपही काढून दिले आहेत. या घटनेचा पुढील तपास ठाणेदार युवराज रबडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल अशोक चाटे, गजानन सानप, श्रावण डोंगरे, शिवाजी बारगजे हे करीत आहेत.
-- मोटारपंप चोरटे सक्रिय--
जिल्ह्यात गेल्या काही काळापासून मोटारपंप चोरटे सक्रिय आहेत. अमडापूर परिसरातही मध्यंतरी शेतकऱ्यांचे मोटारपंप चोरी जाण्याच्या घटना घडल्या होत्या. या प्रकरणातही त्यावेळी अमडापूर पोलिसांनी आरोपींना अटक केली होती. आता किनगाव राजा परिसरातील या घटनेमुळे पुन्हा मोटारपंप चोरटे सक्रिय तर झाले नाही ना, अशी शंका उपस्थित होत आहे.