बुलडाणा दि. 0८- स्थानिक जिजामाता प्रेक्षागार परिसरात सुरू असलेल्या गरबा उत्सवात एका युवकाने क्षुल्लक कारणावरून चार युवकांवर चाकूने हल्ला करून गंभीर जखमी केले. सदर घटना ७ ऑक्टोबर रोजी रात्री ९.३0 वाजता घडली. बुलडाणा शहरात मागील काही वर्षांपासून नवरात्रोत्सवदरम्यान गरबाचे आयोजन करण्यात येते. त्यात मोठय़ा संख्येने गरबा खेळाडू व प्रेषक उपस्थित राहतात. दरम्यान, ७ ऑक्टोबर रोजी रात्री चाकू हल्ल्यानंतर वार्ड क्रमांक २ मधील सुनील अशोक राजभोज (वय २५) यांनी बुलडाणा शहर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली की, भाऊ अमित राजभोज गरबा खेळण्यासाठी जिजामाता प्रेक्षागार येथे गेला होता. यावेळी आरोपी सागर सारंगधर टेंभीकर ऊर्फ गोलू खुर्चिवर उभा राहून नाचत होता. त्याला थांबविण्याचा प्रयत्न केला असता आरोपी गोलूने आपल्या खिशातून चाकू काढला. तसेच जिवाने मारण्याच्या उद्देशाने समोर असलेल्या व्यक्तींवर हल्ला केला. त्यात सुमित राजभोज, अमित राजभोज तसेच सोपान सोळंके व शे. मोहसिन गंभीर जखमी झाले. यावेळी गरबा पाहण्यासाठी आलेल्या काही युवकांनी आरोपी गोलूस पकडून बेदम मारहाण केली. दरम्यान, गंभीर जखमी पाच युवकांना उपचारार्थ बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. या तक्रारीवरून आरोपी सागर टेंभीकर यांच्याविरुद्ध भादंवि कलम ३२४, ३२६, ३0७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेची माहिती मिळताच जखमींचे ना तेवाईक व मित्रांनी रुग्णालयात दाखल होऊन गोंधळ घातला. या घटनेची माहिती पोलीस प्रशासनाला मिळताच दंगा काबू प थकासह पोलीस प्रशासनाचे कर्मचारी मोठय़ा संख्येने रुग्णालय परिसरात दाखल झाले. जखमी युवकांपैकी दोघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी अकोला येथे पाठविण्यात आले. या घटनेचा फायदा घेत काही युवकांनी गरबास्थळी मोठय़ा प्रमाणात तोडफोड केली.
क्षुल्लक कारणावरून चाकूने हल्ला!
By admin | Published: October 09, 2016 1:51 AM