लाेकमत न्यूज नेटवर्कडोणगाव: किरकोळ वादातून डोणगाव येथे बुधवारी रात्री ९.१५ वाजताच्या सुमारास एकावर चाकू हल्ला केल्याची घटना घडली. हल्ल्यात युवक गंभीर जखमी झाला. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेत जखमी झालेल्या युवकाचे नाव ज्ञानेश्वर मोरे असे आहे. चाकू हल्ल्यात त्याची प्रकृती गंभीर असल्याने त्यास प्रथम डोणगाव व तेथून मेहकर, बुलडाणा व शेवटी अकोला येथे उपचारासाठी हलविण्यात आले आहे. पोलिसांनी आरोपी शेख शफीक शेख शब्बीर विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ज्ञानेश्वर गजानन मोरे याचा व शेख शपीक शेख शब्बीर यांच्यात किरकोळ वाद होता. त्याचा राग मनात धरून शेख शफीक शेख शब्बीर याने २३ डिसेंबरच्या रात्री ज्ञानेश्वर मोरे याच्यावर चाकू हल्ला केला. त्यात तो गंभीर जखमी झाला आहे. त्यास त्याच्या वडिलांनी डोणगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते; मात्र त्याची प्रकृती गंभीर असल्याने त्यास तेथून मेहकर व नंतर बुलडाणा येथे पाठविण्यात आले. तेथे प्रथमोपचार करून त्यास अकोला येथे पुढील उपचारासाठी हलविण्यात आले आहे. या घटनेची ज्ञानेश्वर मोरेचा चुलत भाऊ सागर रघुनाथ मोरे याने तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी शेख शफीक शेख शब्बीर विरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक अशोक नरोटे हे करीत आहेत. दरम्यान, या दोघांमध्ये नेमका कुठल्या कारणावरुन वाद झाला होता ही बाब अद्याप स्पष्ट झालेली नाही.
किरकोळ वादातून युवकावर चाकू हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 12:44 PM
Crime News शेख शफीक शेख शब्बीर याने २३ डिसेंबरच्या रात्री ज्ञानेश्वर मोरे याच्यावर चाकू हल्ला केला.
ठळक मुद्दे हल्ल्यात युवक गंभीर जखमी झाला. आरोपी शेख शफीक शेख शब्बीर विरोधात गुन्हा दाखल.