शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
2
"सरकार बनवण्यासाठी काँग्रेस तडफडतंय"; पंतप्रधान मोदींची मुंबईतून पुन्हा 'एक है तो सेफ है'ची घोषणा
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही'; जयंत पाटलांनी अजित पवारांना डिवचले
4
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
5
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
6
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
7
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
9
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
10
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
11
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
12
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
13
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
14
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
15
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
16
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर
17
महाराष्ट्रात मविआ सरकार स्थापन करु, एकही प्रकल्प बाहेर जाऊ देणार नाही; राहुल गांधींचा शब्द
18
BSNL नं लॉन्च केली भारतातील पहिली Satellite-to-Device सर्व्हिस, आता नेटवर्कशिवायही करू शकाल कॉलिंग!
19
विरोधक सत्तेत आले तर पहिली लाडकी बहीण योजना बंद पाडतील; नरेंद्र मोदींची टीका
20
पंकजांनंतर अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; म्हणाले, "मी सेक्युलर हिंदू पण..."

तहसीलदारांच्या निवासस्थानात कोतवालाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 4:23 AM

मोताळा तहसीलदारांच्या शासकीय निवासस्थानामध्ये कोणी हजर नसताना या निवासस्थानासोबतच कार्यालयाची देखभाल करणाऱ्या कोतवालाने गळफास घेऊन आत्महत्या केली. तहसीलदार ...

मोताळा तहसीलदारांच्या शासकीय निवासस्थानामध्ये कोणी हजर नसताना या निवासस्थानासोबतच कार्यालयाची देखभाल करणाऱ्या कोतवालाने गळफास घेऊन आत्महत्या केली. तहसीलदार रविवार असल्याने बाहेरगावी गेले होते. त्यामुळे निवासस्थानी कोणीही नव्हते. विष्णू शंकर सुरपाटणे (४४) असे मृत कोतवालाचे नाव आहे. त्याने नेमक्या कोणत्या कारणावरून आत्महत्या केली ही बाब अद्याप स्पष्ट झालेली नाही. मात्र पोलीस त्याचा शोध घेत आहेत. विष्णू सुरपाटणे यांचा फोन लागत नसल्याने त्यांच्या मुलांनी तहसील कार्यालयासह परिसरात त्यांचा शोध घेतला असता तहसीलदारांच्या शासकीय निवासस्थानी पंख्याला गळफास घेऊन विष्णू सुरपाटणे यांनी आत्महत्या केल्याचे समोर आले.

घटनेची माहिती मिळताच बोराखेडीचे ठाणेदार माधवराव गरुड व त्यांचे सहकारी तसेच महसूल विभागाचे अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले.

घटनेचा पुढील तपास साहाय्यक ठाणेदार राहुल जंजाळ करीत आहेत.

मृत व्यक्तीच्या खिशात एक चिठ्ठी सापडली असून त्यामध्ये तीन व्यक्तींची नावे असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. घटनास्थळाचा पंचनामा करून बोराखेडी पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला असून या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.