मेहकर तालुक्यात दररोज कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे रुग्णांसाठी बेड कमी पडत आहेत. या गंभीर बाबीची दखल घेत मेहकर मतदारसंघाचे आमदार डॉ. संजय रायमुलकर यांच्या पुढाकाराने व जिल्हा प्रशासनाच्या सहकार्याने येथील ग्रामीण रुग्णालयाच्या नवीन इमारतीत १०० बेडचे कोरोना केअर सेंटर लवकरच उभारण्यात येणार आहे. २५ एप्रिल रोजी ग्रामीण रुग्णालयातील नवीन सेंटरला भेट दिली व तेथील व्यवस्था, सोयी सुविधांची पाहणी केली. या ठिकाणच्या १०० बेडची व्यवस्था, सोयी सुविधांची पाहणी केली. या ठिकाणचे १०० खाटांचे कोरोना केअर केंद्र सुरू झाल्यानंतर कोरोना बाधितांवर उपचार करणे सोयीचे जाणार आहे, असे मत रायमुलकर यांनी व्यक्त केले.
याप्रसंगी तहसीलदार डॉ. संजय गरकल, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. महेंद्र सरपाते, विवेकानंद आश्रमाचे उपाध्यक्ष अशोक थोरहाते, मंडळ अधिकारी साळवे, नितीन इंगळे, विठ्ठल भाकडे, पवन शेळके, चेतन आकोटकर, आदी उपस्थित होते.