--तीन आरटीपीआर मशीन--
कोरोनाच्या चाचणीसाठी जिल्ह्यात सध्या तीन आरटीपीसीआर चाचण्या करणाऱ्या मशीन उपलब्ध आहेत. सोबतच कोरोना व्हायरसचा आरएनए एक्स्ट्रॅक्ट करण्यासाठी दोन मशीन उपलब्ध आहेत. यातील प्रत्येकी एक मशीन ही खामगाव जिल्हा रुग्णालयास दिली जाण्याची शक्यता आहे. अद्याप त्यासंदर्भात अंतिम निर्णय झाला नाही. मात्र खामगाव कोविड लॅबसाठीही काही यंत्रसामुग्रीची गरज असल्याचे सूत्रांनी सांगितले.
--१२ अधिकारी कर्मचाऱ्यांची गरज--
खामगाव येथील कोविड लॅब कार्यान्वित होण्यासाठी एक वैद्यकीय अधिकारी, मायक्रो बायोलॉजिस्ट, तंत्रज्ञ आणि डाटा एंट्री ऑपरेटर असे मिळून किमान १२ जणांची अवश्यकता आहे. त्याचीही आरोग्य विभागाने तजबीज केली असल्याचे स्पष्ट केले. बुलडाणा येथील व्याप मोठा असल्याने येथील लॅबमध्ये आता जवळपास २० कर्मचारी कार्यरत करण्यात आल्याने तेथील ताणही काही प्रमाण कमी होण्यास मदत होत आहे.