शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'दगडा पेक्षा वीट बरी' प्रमाणे महाविकास आघाडी पेक्षा महायुती बरी; लक्ष्मण हाकेंनी स्पष्टच सांगितलं
2
'आप'ला मोठा धक्का, मंत्री कैलाश गेहलोत यांनी दिला पदाचा राजीनामा, पक्षालाही ठोकला रामराम 
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : बारामतीमध्ये शरद पवारांच्या बॅगांची तपासणी; अधिकाऱ्यांनी हेलिकॉप्टरमधील साहित्याची केली तपासणी
4
अजित पवार प्रचंड जातीवादी माणूस, त्यांनी कायम...; जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप
5
"मणिपुर ना एक है, ना सेफ है", हिंसाचारावरून मल्लिकार्जुन खरगेंचा PM नरेंद्र मोदींवर निशाणा
6
मुंबईमध्ये अपक्षांना थारा नाहीच! ३६ मतदारसंघांतील आकेडवारी काय सांगते?
7
मुंबई : अभिनेत्याच्या पत्नीला आला एक मेसेज; सायबर ठगाने कसा घातला गंडा?
8
मुंबईवरून आलेल्या ट्रॅव्हल्समध्ये सापडली कोट्यवधीची रक्कम, मोजदाद सुरू; पोलिसांनी ठेवला पहारा
9
Amit Shah : चार नियोजित सभा सोडून अमित शाह तातडीने दिल्लीकडे रवाना; नेमकं कारण काय?
10
"मला जेलमध्ये टाकण्याची भाषा करू नका"; एकनाथ शिंदेंनी थोपटले दंड
11
Chalisgaon Vidhan Sabha: जुन्या पक्क्या मित्रांमध्ये रंगली आहे कट्टर लढत!
12
निष्काळजीपणा की कट? रुग्णालयातील NICU वॉर्डमध्ये कशी लागली आग; समोर आला रिपोर्ट
13
देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेले हे निर्णय विधानसभा निवडणुकीत ठरू शकतात गेमचेंजर
14
Indian Players Injured, IND vs AUS 1st Test: टीम इंडिया संकट में है! पहिल्या कसोटीआधी भारतीय संघातील ४ स्टार खेळाडू दुखापतग्रस्त
15
नाशिकमध्ये राज ठाकरेंचा विरोधकांवर घाव, तर अजित पवारांनी ताईंचा वाढवला भाव
16
Bachchu Kadu : "लोकसभेच्या निकालाची पुनरावृत्ती करा"; बच्चू कडू यांचं आवाहन
17
"आता मी थोड्याच दिवसांचा पाहुणा’’, मनोज जरांगे पाटील भावूक; समर्थकांना केलं असं आवाहन
18
शादी मुबारक! पापाराझींच्या कमेंटवर तमन्ना भाटियाची अशी रिॲक्शन; विजय वर्माला हसू आवरेना
19
Ashish Shelar : "स्टेज खचला! संकेत कळला?, भाषण संपताच खचते पायाखालची माती"; शेलारांचा ठाकरेंना टोला
20
"लष्कर-ए-तैयबाचा सीईओ बोलतोय...", रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला धमकीचा फोन

व्याजाच्या पैशाला कंटाळून प्रयोगशाळा परिचराची आत्महत्या; आठ जणांविरुद्ध गुन्हा

By विवेक चांदुरकर | Published: June 19, 2024 1:39 PM

वृंदावन नगर येथील रहिवासी चैनसिंग अमरसिंह चव्हाण (वय ५५) लि.भो.चांडक विद्यालयात प्रयोगशाळा परिचर म्हणून कार्यरत होते.

मलकापूर: व्याजाच्या पैशाला कंटाळून येथील लि.भो.चांडक विद्यालयातील प्रयोगशाळा परिचराने आत्महत्या केली. विष प्राषनानंतर पाचव्या दिवशी १९ जून रोजी पहाटे त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी आठ जणांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

वृंदावन नगर येथील रहिवासी चैनसिंग अमरसिंह चव्हाण (वय ५५) लि.भो.चांडक विद्यालयात प्रयोगशाळा परिचर म्हणून कार्यरत होते. त्यांनी १३ जून रोजी विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.या प्रकरणी त्यांचा मुलगा सचिन चैनसिंग चव्हाण यांनी १८ जून रोजी शहर पोलिसात फिर्याद दाखल केली. 

त्यात नमूद केले की, चैनसिंग चव्हाण यांना रामेश्वर पाटील यांनी ३ हजार रुपये व्याजाने दिले होते. त्या पैशांवरील व्याजाच्या पैशांसाठी घरी येऊन, फोनवरून व समक्ष धमक्या देत पैशाची मागणी करीत होते. चैनसिंग चव्हाण यांना ते चांडक विद्यालयात जावून जीवे मारण्याच्या धमक्या देत होते. तसेच माझे सुद्धा चारचाकी वाहन अडवून जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या. जातीवाचक शिवीगाळ करून जीवे मारण्याच्या उद्देशाने धमक्या दिल्या व आत्महत्येस प्रवृत्त केले.

या प्रकरणी पोलिसांनी सचिन चैनसिंग चव्हाण यांच्या फिर्यादीवरून रामेश्वर पाटील, राहुल पाटील, संतोष पाटील, स्वप्निल भगत व आणखी ८ जणांविरुद्ध कलम ३०६, ३४१, ५०४, ५०६, ३४ भा.द.वी.सहकलम ३(१),(१),३(१),(s) अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम १९८९ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. व्याजाच्या पैशावरुन आत्महत्येस प्रवृत्त करणे व अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आल्याने या प्रकरणी पोलीस उपविभागीय अधिकारी देवराम गवळी घटनेचा तपास करीत आहेत.

टॅग्स :buldhanaबुलडाणा