महाराष्ट्र परावैद्यक अधिनियम २०११ हा राज्यामध्ये लागू केला असून, सदर कायद्याद्वारे विहीत महाराष्ट्र परावैद्यक परिषदेची अधिकृत रीतीने महाराष्ट्र शासनाद्वारे स्थापना करण्यात आलेली आहे. या सर्व पृष्ठभूमीवर काही असामाजिक तत्त्व खंडणी वसूल करण्याच्या उद्देशाने काही क्लीनिकल लॅब चालकांना कागदपत्राची मागणी करण्यासह खंडणी मागत आहेत. लॅब फोडण्याची जाहीर धमकीसुद्धा दिली जात असल्याचे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. निवेदन देताना मेडिकल लॅबोरेटरी टेक्निशियन अँड प्रॅक्टिशनर असोसिएशनचे महाराष्ट्र प्रदेश संघटक सचिन कोकाटे, प्रदेश सोशल मीडिया प्रमुख अतुल उरसाल, जिल्हाध्यक्ष सुरेश तायडे, उपाध्यक्ष विजय सावंत, सचिव रवी तेजनकर, प्रदीप दुतोंडे, महेंद्र वानखेडे, श्याम सपकाळ, किरण काळे, विनायक दळवी, पवन एकडे, अक्षय भराड, गजानन सुरडकर, किशोर जाधव, शेख अवेज, शेख जुबेर, शिवनारायण जाधव, राहुल चवरे, विजय बांगर, सचिन धांडे, समाधान हाडे, दीपक मगर, राजेश माळवे, सतीश धांडे, संदीप जुनघरे, जितेश पवार, गोपाल धोटे, ज्ञानेश्वर गाडेकर आदींसह जिल्ह्यातील क्लिनिकल लॅब संचालक व संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
प्रयोगशाळा चालकांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 03, 2021 4:34 AM