बीजप्रक्रिया प्रात्यक्षिक
धोत्रा नंदई : देऊळगाव राजा कृषी विभागांतर्गत सोयाबीन बीजप्रक्रिया प्रात्यक्षिक कार्यक्रम धोत्रा नंदाई शिवारात पार पडला. यावेळी सरपंच शिवानंद मुंढे, माजी जि. प. सदस्य भगवान मुंढे, पोलीसपाटील कारभारी मुंढे, बंडू घुगे उपस्थित होते.
पदोन्नतीतील आरक्षण स्थगितीला विरोध
देऊळगाव राजा : मागासवर्गीय कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीतील आरक्षण स्थगितीबाबतचा शासन निर्णय काढण्यात आला होता. या आरक्षण स्थगितीला कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्या वतीने विरोध दर्शविण्यात आला आहे. यासंदर्भात त्यांनी तहसीलदारांना निवेदन दिले आहे.
‘कोरोनाला हरवायचे असेल, तर लसीकरण महत्त्वाचे’
साखरखेर्डा : कोरोनाला हरवायचे असेल तर लसीकरण महत्त्वाचे आहे. त्यासाठी सर्वांनी लस घ्यावी, असे प्रतिपादन अन्न व औषध प्रशासनमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी केले. ते साखरखेर्डा येथील पलसिद्ध मठात आयोजित कोरोनायोद्ध्यांच्या सन्मानप्रसंगी बोलत होते.
आता कानांना बुरशी, बॅक्टेरियाचा धोका
बुलडाणा : पावसाळा सुरू झाला की, विविध प्रकारचे साथीचे आजार बळावतात. या साथीच्या आजारांबरोबरच कानाचे आजारही डोके वर काढतात. पावसात भिजल्याने कानात पाणी जाऊन बुरशी, बॅक्टेरियाचा धोका मोठ्या प्रमाणात संभवतो. नागरिकांना अशी लक्षणे दिसल्यास त्यांनी डॉक्टरांना दाखविणे गरजेचे आहे. अन्यथा कानाला इजा पोहोचून बहिरेपणा येण्याची शक्यता नाकारता येत नाही.