येथील पुलावर बांधकामापासूनच संरक्षक कठडे नाहीत. सध्या या मार्गावर रहदारी वाढली आहे. त्यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. सध्या पावसाळा सुरू झाल्याने नदीला मोठ्या प्रमाणात पुराचे पाणी येते. एखादे वेळेस पाऊस सुरू असला, तर रात्रीचा वाहनधारकांना अंदाज न आल्यास वाहन पुलाच्या खाली जाऊ शकते. त्यामुळे मोठा अपघात होऊ शकतो. विदर्भ व मराठवाड्याच्या सीमेवर असलेल्या धामणा नदीवरील पुलाला कठडे लावण्याची मागणी अनेक वर्षांपासून केली जात आहे. परंतु या मागणीकडे दुर्लक्षच केले जात असल्याचे दिसून येत आहे. नदी अथवा पुलाचे बांधकाम करताना अंदाजपत्रकात संरक्षक कठड्यासह अन्य खर्च नमूद असतो, परंतु या बाबीकडे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून लक्ष दिले जात नसल्याने पुलावर कठडे बसविण्यात आलेले नाहीत.
धामणगाव-पारध रस्त्यावरील पुलावर कठड्याचा अभाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 4:23 AM