- अनिल गवई लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : कोरोना विषाणू संक्रमण काळातच आरोग्य यंत्रणेला अत्यल्प अधिकारी, कर्मचाऱ्यांमध्ये काम करावे लागत असल्याचे चित्र आहे. खामगाव येथील सिव्हील हॉस्पीटलमध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांची (वर्ग-१ आणि वर्ग-२) तब्बल १९ तर वर्ग-३ची तब्बल ४७ पदे रिक्त आहेत. याचा फटका शहर आणि परिसरातील भागातील रुग्णांना बसू लागल्याचे दिसून येते.खामगाव आणि परिसरात कोरोना विषाणूचे संक्रमण दिवसागणिक वाढू लागले आहे. रूग्णसंख्येत प्रतिदिन झपाट्याने वाढ होत असतानाच कोरोनाला प्रंतिबंध घालण्यासाठी सिव्हील हॉस्पीटलमध्ये वैद्यकीय अधिकाºयांची संख्या तोकडी भासत आहे. त्याचवेळी वर्ग-३ चीही अनेक पदे रिक्त असल्याने कोविड रूग्णालय आणि सामान्य रूग्णालयाचा कारभार हाकताना वैद्यकीय अधिकाºयांची चांगलीच दमछाक होताना दिसत आहे.कोरोना संकटकाळात आरोग्य यंत्रणा तगडी असणे गरजेचे आहे. मात्र, खामगाव येथील सिव्हील हॉस्पीटल या विपरीत चित्र दिसून येत आहे. सिव्हील हॉस्पीटल मधील वर्ग १ आणि वर्ग-२ अधिकारी तसेच डॉक्टरांच्या रिक्त जागेच्या संख्येवर नजर टाकली असता, विदारक वास्तव समोर येते. खामगाव उपजिल्हा सामान्य रूग्णालयात वर्ग-१ आणि वर्ग-२ ची एकुण १९ पदे रिक्त आहेत. तर वर्ग-३ ची तब्बल ३२ पदे रिक्त असून वर्ग-४ ची १९ पदे रिक्त आहेत. सध्या या जागा भरण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
रिक्तजागांमुळे आरोग्य यंत्रणेवर वाढला ताण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2020 10:10 AM