लोकमत न्यूज नेटवर्ककिनगावराजा: येथून जवळच असलेले देवखेड येथील मराठी प्राथमिक शाळेत शिक्षकांचा अभाव आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. याकडे वरिष्ठांनी लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.देवखेड गाव पूर्णा काठावर असून, या गावची ग्रामपंचायतही स्वतंत्र आहे. गावची लोकसंख्या जवळपास २५०० ते ३००० पर्यंत आहे. या गावामध्ये जिल्हा परिषदेची शाळा सप्टेंबर १९३० ते १९३४ च्या दरम्यान सुरू झाली आहे. यामध्ये २०१३ पर्यंत वर्ग १ ते ४ सुरू होते. शासनाच्या नवीन धोणानुसार २०१३ मध्ये वर्ग ५ ची सुरुवात करण्यात आली होती. वर्ग १ ते ५ मागील वर्षापर्यंत पटसंख्या जवळपास १२५ ते १३० च्या आसपास होती; परंतु मागील सत्रापासून शिक्षकांच्या कमतरतेमुळे विद्यार्थी संख्या रोडवत आहे. या शाळेत ४ ते ५ शिक्षकांची आवश्यकता आहे; परंतु जुलै महिन्यात शाळा सुरू होऊनही शिक्षकांची कमतरता आहे. सध्या या शाळेत कायमस्वरूपी शिक्षक नसल्यामुळे वर्दडी येथील शिक्षक सुदाम खरात तर तांदुळवाडी या शाळेतील शिक्षक गंगाधर खरात यांना तात्पुरत्या नियुक्त्या देण्यात आल्या आहेत. तर मोरे हे जानेवारी २०१७ ला रुजू होऊन ते आजपर्यंत मेडिकल रजेवर आहेत. शिक्षकांच्या कमतरतेमुळे बऱ्याच पालकवर्गाची नाराजी असून, काही पालक वर्गांनी आपली मुले रुम्हणा येथील प्राथमिक शाळेत टाकण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे वर्ग ५ वा गावात असूनसुद्धा येथील चिमुकल्या विद्यार्थ्यांना बाहेरगावी जाण्याचा त्रास सहन करावा लागत आहे. तरी संबंधित खात्याने याकडे लक्ष देऊन सदर शाळेत कायमस्वरूपी शिक्षक नेमावे, अशी मागणी बबन सरकटे, भास्कर पिसे, दिलीप भोसले या नागरिकांकडून होत आहे. गट शिक्षण अधिकारी यांचेकडे शिक्षकांची प्राथिमक शाळेकरता मागणी केली आहे. सध्या त्यांनी तात्पुरते दोन शिक्षक दिले. लवकरच पुन्हा दोन शिक्षक देणार आहेत.- संजय आढाव, सरपंच देवखेड.
देवखेड मराठी प्राथमिक शाळेत शिक्षकांचा अभाव
By admin | Published: July 17, 2017 1:43 AM