शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

आमखेड येथील तलाव फुटला,शेतात पाणीच पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 4:23 AM

चिखली : तालुक्यातील पूर्वेकडील भागात २८ जूनला सायंकाळी पाचच्यासुमारास सुरुवात झालेल्या पावसाने रौद्ररूप धारण केल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले ...

चिखली : तालुक्यातील पूर्वेकडील भागात २८ जूनला सायंकाळी पाचच्यासुमारास सुरुवात झालेल्या पावसाने रौद्ररूप धारण केल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, या भागातील गांगलगाव भागात झालेल्या ढगफुटीसदृश पावसामुळे आमखेड येथील पाझर तलाव फुटला आहे. या भागातील सर्वच नदी नाल्याने पूर आल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे.तलाव फुटल्याने चिखली, मेहकर आणि सिंदखेड राजा तालुक्यातील शेकडाे हेक्टरवरील पिकांचे माेठ्या प्रमाणात नुकसान झाले़

चिखली तालुक्याला पावसाची मोठी प्रतीक्षा होती. २८ जूनरोजी पाऊस सर्वत्र दमदार बरसल्याने पेरणी रखडलेले शेतकरी सुखावले आहेत. मात्र, ज्या भागात आधी पेरण्या झालेल्या होत्या व जिथे पावसाची आवश्यकता नव्हती, त्या भागात आज ढगफुटीसदृश पाऊस कोसळला. यामध्ये मंगरूळ नवघरे, डोंगरगाव, पाटोदा, सावरखेड, एकलारा, वरखेड, भोरसा-भोरसी, गांगलगाव व परिसरातील गावांमध्ये सुमारे दीड ते दोन तास धुव्वाधार पाऊस कोसळल्याने या भागातील शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. या भागात आधी पेरणीयोग्य पाऊस झालेला होता. त्यामुळे या भागातील खरिपाच्या पेरण्या उरकल्या होत्या. मात्र, या पावसाने अनेक शेतकऱ्यांनी पेरलेले बियाणे वाहून गेले, शेतजमिनी खरडून गेल्या आहेत, तसेच नुकतेच बियाणे अंकुरलेल्या शेतात सर्वत्र पाणी साचले असल्याने अनेक शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे.

भाेगावती नदीला महापूर

गांगलगाव शिवरात कोसळलेल्या जोरदार पावसामुळे आमखेड येथील मध्यम स्वरूपाचा पाझर फुटला असून, मातीचा बांध वाहून गेला आहे. या तलावाच्या फुटण्यामुळे गावास कोणताही धोका नव्हता मात्र, त्याच्या फुटण्याने तलावाखालील शेती क्षेत्राचे प्रचंड नुकसान झाले आहे. दरम्यान, आजच्या पावसाचे कुठेही जीवितहानी झाली नसली, तरी वित्तहानी मोठ्या प्रमाणावर असण्याची शक्यता असल्याचे तहसीलदार अजितकुमार येळे यांनी म्हटले आहे. दरम्यान, पाझर तलाव फुटल्याने लव्हाळा साखरखेर्डा मार्गावरील भोगावती नदीला महापूर आला होता.

माेहाडी येथे १०० शेतमजूर अडकले

मेहकर तालुक्यातील आमखेड येथील तलाव फुटल्याने मोहाडी येथील १०० हून अधिक शेतकरी आणि शेतमजूर अडकले आहेत. सरपंच अशोक रिंढे, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शिवदास रिंढे, बबनराव रिंढे, नंदकिशोर रिंढे, विलास आबा रिंढे यासह गावातील नागरिक अडकलेल्यांना सुरक्षितस्थळी थांबून त्यांना लव्हाळामार्गे गावात आणण्यासाठी प्रयत्न करीत हाेते़