शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
4
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
5
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
6
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
7
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
8
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
9
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
10
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
11
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

आमखेड येथील गाव तलाव फुटला;शेतात पाणीच पाणी! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 11:16 IST

Lake in Amkhed bursts : चिखली, मेहकर आणि सिंदखेड राजा तालुक्यातील शेकडाे हेक्टरवरील पिकांचे माेठ्या प्रमाणात नुकसान झाले़.

लोकमत न्यूज नेटवर्कचिखली : तालुक्यातील पूर्वेकडील भागात २८ जूनला सायंकाळी पाचच्यासुमारास सुरुवात झालेल्या पावसाने रौद्ररूप धारण केल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, या भागातील गांगलगाव भागात झालेल्या ढगफुटीसदृश पावसामुळे आमखेड येथील पाझर तलाव फुटला आहे. या भागातील सर्वच नदी नाल्याने पूर आल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे.तलाव फुटल्याने चिखली, मेहकर आणि सिंदखेड राजा तालुक्यातील शेकडाे हेक्टरवरील पिकांचे माेठ्या प्रमाणात नुकसान झाले़. चिखली तालुक्याला पावसाची मोठी प्रतीक्षा होती. २८ जूनरोजी पाऊस सर्वत्र दमदार बरसल्याने पेरणी रखडलेले शेतकरी सुखावले आहेत. मात्र, ज्या भागात आधी पेरण्या झालेल्या होत्या व जिथे पावसाची आवश्यकता नव्हती, त्या भागात आज ढगफुटीसदृश पाऊस कोसळला. यामध्ये मंगरूळ नवघरे, डोंगरगाव, पाटोदा, सावरखेड, एकलारा, वरखेड, भोरसा-भोरसी, गांगलगाव व परिसरातील गावांमध्ये सुमारे दीड ते दोन तास धुव्वाधार पाऊस कोसळल्याने या भागातील शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. या भागात आधी पेरणीयोग्य पाऊस झालेला होता. त्यामुळे या भागातील खरिपाच्या पेरण्या उरकल्या होत्या. मात्र, या पावसाने अनेक शेतकऱ्यांनी पेरलेले बियाणे वाहून गेले, शेतजमिनी खरडून गेल्या आहेत.

भाेगावती नदीला महापूरगांगलगाव शिवरात कोसळलेल्या जोरदार पावसामुळे आमखेड येथील मध्यम स्वरूपाचा पाझर फुटला असून मातीचा बांध वाहून गेला आहे. या तलावाच्या फुटण्यामुळे गावास कोणताही धोका नव्हता मात्र, त्याच्या फुटण्याने तलावाखालील शेती क्षेत्राचे प्रचंड नुकसान झाले आहे. दरम्यान आजच्या पावसाचे कुठेही जिवीत हानी झालेली नसली तरी वित्त हानी मोठ्या प्रमाणावर असण्याची शक्यता असल्याचे तहसीलदार अजितकुमार येळे यांनी म्हटले आहे. दरम्यान पाझर तलाव फुटल्याने लव्हाळा साखरखेर्डा मार्गावरील भोगावती नदीला महापूर आला होता.

टॅग्स :buldhanaबुलडाणाChikhliचिखलीMehkarमेहकरRainपाऊस