शहरं
Join us  
Trending Stories
1
"शाहू महाराजांना फोन आला अन् मधुरिमाराजेंनी..."; शेवटच्या १० मिनिटांत घडलेल्या राजकीय भूकंपाचे कारण समोर
2
त्यांनी बाळासाहेबांचे विचार आणि धनुष्यबाण गहाण ठेवले होते; शिंदेंसाठी CM शिंदेंची बॅटिंग, ठाकरेंवर हल्ला
3
राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांवर केलेल्या टीकेला संजय शिरसाट यांचं प्रत्युत्तर; स्पष्टच बोलले
4
भाजपाला मोठा धक्का, अपक्ष निवडणूक लढवत असलेल्या माजी महिला खासदाराचा पक्षाला राम राम
5
“कोल्हापूर उत्तर आम्ही ७ वेळा जिंकली, ७ दिवस भांडलो पण काँग्रेसने जागा सोडली नाही”: संजय राऊत
6
नवाब मलिकांवरून अजितदादा गटाने भाजपा-शिंदे गटाला फटकारलं; "कुणाला काही वाटू दे..."
7
राजेश लाटकर घेणार उद्धव ठाकरेंची भेट! कोल्हापुरात राजकीय घडामोडींना वेग
8
काँग्रेसच्या बालेकिल्ल्यातून यंदा काँग्रेसचेच चिन्ह झाले 'हद्दपार'
9
AUS vs IND : भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा! टीम इंडियासमोर मोठे आव्हान, शिखर धवननं दिला धीर
10
Sameer Bhujbal : दहा अपक्ष उमेदवारांनी माघार घेत समीर भुजबळ यांना दिला पाठिंबा
11
विराट कोहलीसाठी सिक्सर किंग युवीनं शेअर केली खास पोस्ट
12
महाले यांची माघार; भुजबळ, आहेर, गावित ठाम! दिंडोरीत नरहरी झिरवाळ यांना दिलासा
13
"मी यापुढे मराठी बोलणार नाही..."; रेल्वे टीसीचा मुजोरपणा, मराठी माणसाला धमकावलं
14
चातुर्मासाची सांगता: कार्तिकी एकादशी कधी आहे? विष्णुप्रबोधोत्सव महात्म्य अन् मान्यता
15
बारामतीचं राजकीय तापमान वाढणार: अजित पवारांना शह देण्यासाठी शरद पवार मैदानात; आज ६ ठिकाणी सभा!
16
Niva Bupa IPO : 'या' दिग्गज हेल्थ इन्शूरन्स कंपनीचा IPO येणार; किंमत किती, कधीपासून करता येणार अर्ज?
17
...यासाठी बाळासाहेब ठाकरे राज ठाकरेंना माफ करणार नाहीत; संजय राऊत भडकले
18
आजपासून महायुतीच्या प्रचाराचा प्रारंभ; पहिली सभा कोल्हापुरात, मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार!
19
शुक्राचा गुरु राशीत प्रवेश: १० राशींवर धनलक्ष्मी कृपा, अचानक धनलाभाचे योग; शुभ-लाभाचा काळ!
20
Devayani Farande : मध्य नाशिक मतदारसंघात बंडखोरांच्या माघारीचा भाजपाच्या देवयानी फरांदेंना फायदा

लाखो भाविकांनी फुलली संतनगरी; ‘श्रीं’चा प्रकट दिन सोहळा उत्साहात! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 08, 2018 1:06 AM

जय गजानन श्री गजानन गण गण गणात बोते... नामघोष करीत ३ लाख भाविक भक्तांचा भक्तीसागर व १३१८ भजनी दिंड्यांच्या सहभागातून श्रींचा १४0 वा प्रकट दिन उत्सव ७ रोजी भक्तीमय वातावरणात पार पडला.

ठळक मुद्दे पोलिसांचाही होता चोख बंदोबस्तलाखो भाविक झाले ‘श्रीं’च्या चरणी नतमस्तक

लोकमत न्यूज नेटवर्कशेगाव : ‘अनु रेणुमध्ये ब्रम्ह व्यापीले लय उत्पत्ती समान।माघ सप्तमी पुण्य दिवसी प्रकटला योगी महान।।गजानना अवलीया, अवतरले जग ताराया।जय गजानन श्री गजानन गण गण गणात बोते।।नामघोष करीत ३ लाख भाविक भक्तांचा भक्तीसागर व १३१८ भजनी दिंड्यांच्या सहभागातून श्रींचा १४0 वा प्रकट दिन उत्सव ७ रोजी भक्तीमय वातावरणात पार पडला.बुधवार माघ वद्य ७ फेब्रुवारी रोजी हा श्रींचा प्रकट दिन यासाठी भक्तांनी रात्रीपासून श्रींच्या समाधी दर्शनासाठी आनंद सागर विसावापर्यंत श्रींच्या समाधी दर्शनासाठी रांग लावली होती. श्रींचा प्रकट दिन उत्सव संस्थानच्यावतीने १  पासून ७ रोजी उत्सवात काकडा, भजन, प्रवचन, हरिपाठ, कीर्तनद्वारे भक्तांच्या उपस्थितीत घेण्यात आले. ७ रोजी  श्रीरामबुवा ठाकूर मु. परभणी यांचे सकाळी १0 ते १२ ‘शेगावी श्रींच्या प्रागट्या’ निमित्त कीर्तन करण्यात आले. यात हजारो भक्तांनी श्रवणाचा लाभ घेतला. सकाळी १0 वा. यागाची पूर्णाहूती व अवभृतस्नान श्री गजानन महाराज संस्थानचे व्यवस्थापकीय विश्‍वस्त कर्मयोगी शिवशंकरभाऊ पाटील यांच्या हस्ते पूजन करून करण्यात आले.  यावेळी श्री गजानन महाराज संस्थानचे अध्यक्ष नारायणराव पाटील, कार्यकारी विश्‍वस्त नीळकंठदादा पाटील, डॉ.रमेश डांगरा, गोविंदराव कलोरे, अशोकराव देशमुख, किशोर टांक, पंकज शितुत, चंदुलालजी अग्रवाल, प्रमोद वसंतराव गणेश या विश्‍वस्त मंडळांची प्रामुख्याने उपस्थिती होती. दुपारी १२ वा. श्रींचे प्रागट्यानिमित्त संस्थानच्यावतीने श्रींच्या समाधी मंदिरावर भक्तांच्या मांदियाळीत व कर्मयोगी शिवशंकरभाऊ पाटील यांच्या उपस्थितीत विश्‍वस्त मंडळ यांच्या उपस्थितीत श्रींचे भक्त यांनी श्रींच्या समाधी मंदिरावर पुष्पवृष्टी केली. मनोभावे श्रींच्या भक्तांनी आंतरिक भावेने पुष्पांची भावरूपी भक्ती श्रींच्या चरणी अर्पण केली.

ठिकठिकाणी महाप्रसाद व धार्मीक कार्यक्रमशेगावसह घाटाखालील खामगाव, नांदुरा, मलकापूर, जळगाव जामोद, संग्रामपूर तालुक्यात अनेक गावांमध्ये श्री. गजानन महाराज यांच्या प्रकटदिनानिमित्त धार्मिक कार्यक्रम पार पडले. अनेक ठिकाणी महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. दरम्यान, सामाजिक संस्थांनी स्वच्छतेसाठी पुढाकार घेतल्याचे दिसून आले. श्रींचा प्रकट दिन उत्साहात साजरा करण्यात आला. शेगाव मार्गावर दिवसभर भाविकांची गर्दी दिसून आली. 

टॅग्स :Gajanan Maharaj Mandirगजानन महाराज मंदिर