शरद ज्ञानेश्वर थुट्टे यांचं भरोसा येथे अंचरवाडी रस्त्यावर घर आहे़ कुटुंबातील सर्वच लोक रात्री साडेदहा वाजता झोपलेले होते़ यावेळी अज्ञात चाेरट्यांनी घरात प्रवेश करून कपाटातील एक लाख चाळीस हजारांचे दागिने लंपास केले़ तसेच कपाटातील लेडीज पर्स शेजारील शेतात फेकून दिली़ चाेरट्यांनी लहान मुलांचे दागिने सुद्धा लंपास केले़ घटनेची माहिती मिळताच अंढेरा पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेऊन पंचनामा केला़ शरद थुट्टे यांनी यावेळी श्वान पथकाची मागणी केली असता,गावात अंढेरा स्टेशनचे पोलीस निरीक्षक आठवले यांच्या नेतृत्वात श्वान पथकाच्या मदतीने तपास सुरू करण्यात आला़ या प्रकरणी अज्ञात चाेरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ पुढील तपास अंढेरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आठवले व पो.का.साखरे करत आहेत.
भरोसा येथे लाखो रुपयांचा ऐवज लंपास!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 4:34 AM