गाेरेगावची शाळा हाेणार आदर्श
साखरखेर्डा : सिंदखेड राजा तालुक्यातील गाेरेगाव येथील जिल्हा परिषद शाळेचा आदर्श शाळा याेजनेत समावेश करण्यात आला आहे. राज्यातील ३०० शाळा आदर्श शाळा म्हणून विकसित करण्याचा उपक्रम शासनाने हाती घेतला आहे. यासाठी प्रत्येक तालुक्यातून एका शाळेची निवड करण्यात आली आहे.
थकीत देयक वसुलीसाठी विशेष माेहीम
बुलडाणा : थकीत वीज देयक वसुलीसाठी आता अधिकारी व कर्मचारी प्रत्यक्ष घरोघरी जात आहेत. महावितरणच्या सर्व अभियंत्यांना शंभर टक्के वीज देयक वसुलीचे निर्देश देण्यात आले आहेत. वीज कंपनीची आर्थिक स्थिती खालावली असून, वसुलीशिवाय पर्याय नाही, असे अधिकाऱ्यांचे म्हणने आहे.
आरडव ग्रामपंचायतीला सुंदर गावाचा पुरस्कार
लाेणार : तालुक्यातील आरडव ग्रामपंचायतला सुंदर गाव पुरस्कार नुकताच जिल्हा परिषद कार्यालयात प्रदान करण्यात आला. दहा लाख रुपयांचा धनादेश व प्रमाणपत्र आरडवच्या सरपंच शाेभा आसाराम जायभाये, ग्रामसेवक कारभारी शिंगणे व ग्रामपंचायत सदस्य यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
चार वर्षांपासून रस्त्याचे काम रखडले
मेहकर : शहरातून जाणाऱ्या रस्त्याचे काम मागील चार वर्षांपासून सुरू आहे. अजूनपर्यंत या रस्त्याचे काम पूर्णत्वास गेले नाही. त्यामुळे रस्त्याच्या संथगतीच्या कामाचा फटका आता प्रवाशांना बसत आहे तर रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी होत आहे.
विवाह साेहळ्यांवर पडणार विरजण
बुलडाणा : काेराेना रुग्णांची संख्या वाढत असल्याने प्रशासनाने पाच शहरांमध्ये लाॅकडाऊन जाहीर केले आहे. या शहरांमध्ये लग्न समारंभांमध्ये केवळ २५ लाेकांना परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे विवाह साेहळ्यांवर विरजण पडणार असल्याचे चित्र आहे.
ठिबक नळ्या चोरट्यांकडून लंपास
धामणगाव बढे/ लिहा : येथील शेतकरी प्रदीप सपकाळ यांच्या लिहा ते उऱ्हा मलकापूर रस्त्यावरील शेतातून अज्ञात व्यक्तीने ३५ हजार रुपये किमतीचे साहित्य लंपास केले आहे. याबाबत धामणगाव बढे पोलीस स्टेशनला अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.