जिल्ह्यात ६५०० लॅण्डलाइन
मोबाइलचा वापर वाढलेला असतानाही लॅण्डलाइन मात्र शासकीय कार्यालयात कायमच आहेत. तरुणवर्गात तर मोबाइल फोन हा ‘स्टेटस सिम्बॉल’ झाला आहे. प्रत्येकाकडे मोबाइल असला, तरी लॅण्डलाइनचा वापरही सुरूच आहे. जिल्ह्यात सहा हजार ५०० लॅण्डलाइन वापरात असल्याची माहिती आहे.
क्वाॅइन बॉक्स धूळ खात...
पूर्वी क्वाॅइन बॉक्स प्रत्येक चौकात आणि दुकानात दिसून येत होते. त्यांच्याकडे एसटीडी नाही, ते लोकही क्वाॅइन बॉक्स ठेवत होते. मात्र मोबाइल आल्यापासून क्वाॅइन बॉक्स मात्र धूळ खात पडले आहेत. लॅण्डलाइनचा थोड्याबहुत प्रमाणात वापर होत असला तरी क्वाॅइन बॉक्स मात्र कुठेच दिसून येत नाही. ज्या दुकानदारांकडे पूर्वी क्वाॅइन बॉक्स होता, त्यांनी ते क्वाॅइन बॉक्स आता मुलांच्या खेळण्यात दिले असल्याची माहिती एका दुकानदाराने दिली.
म्हणून लॅण्डलाइन आवश्यक
आज प्रत्येकाकडे मोबाइल आहे. आमच्या घरातही सर्वांकडे मोबाइल असला, तरी लॅण्डलाइनचाही वापर सुरूच आहे. पूर्वीपासून लॅण्डलाइन घरातील प्रत्येकजण वापरतात. घरातील अनेकजण मोबाइलची बॅटरी संपली की, लॅण्डलाइनचा वापर करतात.
ॲड. अनंत वानखेडे.
घरातील वृद्ध मंडळींना आजही मोठा मोबाइल हाताळणे जमत नाही. त्यामुळे त्यांना लॅण्डलाइन सोईचा वाटतो. फोन आल्यानंतर वृद्ध मंडळींना फोन घेता येतो. त्यामुळे लॅण्डलाइनचा वापर सुरू आहे.
ॲड. अंजली देशमुख.