बुलडाणा : मेहकर तालुक्यातील गवढाळा फाट्यावर ११ सप्टेंबर राेजी झालेल्या अपघातात एक ५० वर्षीय अनाेळखी इसम गंभीर जखमी झाला हाेता. त्याला उपचारासाठी सर्वाेपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले हाेते. उपचारादरम्यान त्याचा १३ सप्टेंबर राेजी मृत्यू झाला़ आजपावेताे त्याची ओळखच पटली नसल्याने वंचित बहुजन आघाडीच्या वतीने त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले़
मेहकर तालुक्यातील गवढाळा फाट्यावर ११ सप्टेंबर राेजी अपघात झाला हाेता. या अपघातात अनाेळखी ५० वर्षीय इसम गंभीर जखमी झाला हाेता. त्याला सर्वाेपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले हाेते. तेथे उपचार सुरू असतानाच १३ सप्टेंबर राेजी त्याचा मृत्यू झाला. ओळख न पटल्याने मेहकर पोलिसांनी रुग्ण कल्याण समिती सदस्य वंचित बहुजन आघाडी सामाजिक कार्यकर्ता पराग गवई यांच्याशी संपर्क साधला. तसेच अंत्यविधीचे रीतसर पत्र दिले. या वेळी पराग गवई यांच्याबराेबर संकेत शिरसाठ, प्रज्वल ठोंबरे, रामदास तायडे, विशाल तेलगोटे, कृष्णा घाटोळे, मिठाराम लोंढे, अनिल उपर्वट, स्वप्निल उजगरे, अर्जुन बागडे, अंकित गोपनारायण, विशाल गोपनारायण, राजू गोपनारायण, दिनेश भागानगरे, छोटू सुरवाडे, सुमेध सरदार, अमित तेलगोटे यांनी त्या मृतकांवर अंत्यसंस्कार केले. या वेळी मेहकर पाेलीस ठाण्याच्या पाेलीस निरीक्षक निर्मला परदेशी यांच्या मार्गदर्शनात पोलीस कॉन्स्टेबल गजानन सानप, पोलीस कर्मचारी मोहम्मद परसुवाले आदी उपस्थित हाेते़