काटकर हॉस्पिटलच्या माध्यमातून डॉ. दीपक काटकर अनेकांना सुपरिचित आहेत. सेवेला आधुनिक स्वरूप प्रदान करून एक मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल ॲन्ड ट्रामा केअर सेंटर उभारण्याचे त्यांचे स्वप्न आकाराला आले आहे. बुधवारी त्यांच्या हॉस्पिटलचा उद्घाटन सोहळा पार पडला. त्यांच्या या वैद्यकीय प्रवासात त्यांचे छोटे बंधू डॉ. विरेंद्र एन. काटकर, सून डॉ. सुवर्णा विरेेंद्र काटकर या दोघांची साथ मिळाली आहे. डॉ. दीपक काटकर यांच्या अर्धांगिनी कल्पना दीपक काटकर प्रशासक म्हणून आपली जबाबदारी सांभाळण्यासाठी सज्ज आहेत. या मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल ॲण्ड ट्रामा केअरमध्ये कोविडच्या तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेता स्वतंत्र विलगीकरण कक्ष आणि कोविड आयसीयू उभारण्यात आलेले आहे. २४ तास आपात्कालीन विभाग आहे. दुर्बिणीद्वारे फुप्फुस तपासणी, सुसज्ज ऑपरेशन थिएटर ही या हॉस्पिटलची वेगळी वैशिष्ट्ये. सुसज्ज अद्ययावत आयसीयू, तज्ज्ञ थोरकोस्कोपिस्ट, फुप्फुसांचे आजार, पोटाचे विकार, सर्पदंश, डायबिटीस, पीएफटी (स्पायरोमेट्री) या सुविधा तर आहेतच, परंतु अस्थिरोग विभाग, ट्रामा केअर सेंटर, मायनर ऑपरेशन थिएटर, ब्रॉन्कोस्कोपी-थोरकोस्कोपी सुट, स्पेशल रूम-डिलक्स रूम, कँटीन सुविधा, २४ तास मेडिकल व लॅब, थॉयराईड, दमा आणि टीबी., पॅरालेसिस, हृदयविकार, ॲलर्जी टेस्टिंग अशा विशेष सुविधाही एकाच छताखाली मिळणार आहेत. या हॉस्पिटलचे उद्घाटन त्यांच्या आई-वडिलांच्या हस्ते पार पडला. यावेळी वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवरांसह जवाहर नवोदय विद्यालय शेगावचे प्रा. आर. आर. कसर, प्रा. एलिझाबेथ बर्गिस, प्रा. मालथी जगधन, प्रा. चित्रा लिखितकर, प्रा. संजय देवल, प्रा. राजू वैष्णव, प्रा. सुभाष येणूगवार यांची उपस्थिती होती. विशेष म्हणजे ज्यांनी त्यांना घडविले त्यांना यावेळी विशेष उपस्थितीत बोलाविण्यात आले होते. डाॅ. विरेंद्र काटकर हे जिल्ह्यातील पहिले बालरुग्ण अस्थि व व्यंगोपचार म्हणून कार्यरत आहेत हे विशेष.
काटकर मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल ॲन्ड ट्रामा केअरचा शुभारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2021 4:37 AM