साखरखेर्डा येथून जवळच असलेल्या गोरेगाव फाट्यावर संपर्क अभियानाला प्रारंभ करण्यात आला. अध्यक्षस्थानी जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवत होते, तर माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर, जिल्हा युवासेना प्रमुख ऋषिकेश जाधव, सिंदखेडराजा नगराध्यक्ष सतीष तायडे, नगर परिषद सभापती राजू आढाव, माजी नगराध्यक्ष देविदास ठाकरे, पंचायत समिती सदस्य शे. शफी, माजी जिल्हा परिषद सदस्य रवींद्र पाटील, बबन जायभाये, उपसभापती बंद्री बोडखे, माजी सरपंच महेंद्र पाटील, युवासेना तालुका प्रमुख सिद्धेश्वर आंधळे यांसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
डाॅ. शशिकांत खेडेकर यांचा पराभव हा अनेकांना चटके लावून गेला आहे. खरंतर निवडणुका संपल्यानंतर राजकारण विसरून समाजकार्याकडे लक्ष केंद्रित केले पाहिजे. आम्ही संयम बाळगत असलो तरी त्याचा गैरवापर कोणी करू नये. आजही डॉ. शशिकांत खेडेकर हे शिवसैनिकांचे आमदारच आहेत. पराभवानंतरही ते काम करीत आहेत, असेही खासदार प्रतापराव जाधव यांनी यावेळी सांगितले. संचालन शिवसेना उपजिल्हाप्रमुख बाबूराव मोरे यांनी केले. यावेळी संदीप मगर, अनंता शेळके, उमनगावचे सरपंच प्रकाश भगत, शांताराम गवई, गजानन देशमुख, सवडदचे सरपंच शिवाजी लहाने, गजानन शेळके, आदित्य काटे, ऋषीकेश रिंढे, गोरेगाव, बाळसमुद्र, राजेगाव यासह अनेक गावांतील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य , शिवसैनिक उपस्थित हाेते.