शेतीचे साहित्य लंपास करणारी टाेळी सक्रिय
किनगाव राजा : परिसरात सध्या भुरट्या चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून चोरटे गावाबरोबर शेतातील साहित्याकडेही लक्ष केंद्रित करीत आहेत. मागील आठवड्यात शेतातून चोरट्यांनी स्प्रिंकलरच्या तोट्या चोरून नेल्या होत्या. त्यामुळे परिसरात पुन्हा एकदा चोरटे सक्रिय झाले असून रात्रीची गस्त वाढवावी, अशी मागणी गावकऱ्यांकडून होत आहे.
सैलानीची यात्रा रद्द झाल्याने भाविकांचा हिरमाेड
बुलडाणा : हिंदू-मुस्लिमांच्या एकतेचे प्रतीक असलेली बुलडाणा जिल्ह्यातील पिंपळगाव सराई येथे दरवर्षी भरणारी सैलानी यात्रा कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सलग दुसऱ्या वर्षीही रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे भाविकांचा हिरमाेड झाला आहे.
ग्रामीण रुग्णालय सुरू हाेण्याची प्रतीक्षा
हिवराआश्रम : येथे ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीचे काम पूर्ण झाले आहे. मात्र, रुग्णालयाचे कामकाज सुरू झालेले नाही. सध्या परिसरात काेराेना रुग्णांची संख्या वाढत असल्याने ग्रामीण रुग्णालय सुरू करण्याची मागणी हाेत आहे.