बुलडाणा: शहरा लगतच्या राजूर घाटात सध्या बिबट्याचा मुक्त संचार आहे. मोताळा-बुलडाणा ये-जा करणाऱ्या नागरिकांना सकाळी आणि सायंकाळच्या वेळेस अगदी घाटातील रस्त्यावरच हा बिबट्या बºयाचदा बसलेला आढळून येतो. १७ मार्च रोजीही सकाळी आठ वाजेच्या सुमारास हा बिबट्या अनेक प्रवाशांना दिसून आला.दरम्यान, दुचाकीवर घाटामधून भरधाव वेगात जाणाऱ्यांसाठी ही धोक्याची घंटा आहे. अगदी अवघ्या काही मिटरच्या अंतरावरून दुचाकीस्वार जात आहे. घाटातील संरक्षण भिंती तो बसलेला आढळत आहे. मंगळवारी तर सकाळी आठ वाजेच्या सुमारास एका दुचाकीस्वाराने दुसºया दुचाकीस्वारास सावध केल्याने तो थोडक्यात बचावला. त्यामुळे सकाळी व सायंकाळी राजूर घाटातून ये-जा करताना नागरिकांनी तथा दुचाकीस्वारांनी सुरक्षेच्या दृष्टीकोणातून एकटे न जाता सहप्रवाशांसह जाण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यातच व्यायाम करणारे आणि फेरण्यास जाणारे अनेक नागरिक आहेत. त्यांनीही गटा गटाने जाण्याची गरज आहे.
राजूर घाटात बिबट्याचा मुक्त संचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2020 12:13 PM