बुलडाणा : बसस्थानक हे जिल्ह्याचे मुख्य बसस्थानक असल्याने येथे दररोजहजारो प्रवाशांची वर्दळ असते. तसेच ग्रामीण भागातून बुलडाणा येथेशिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. मात्रअसे असतांनाही बुलडाणा आगारातून अनेक बसेस ठरलेल्या वेळेत सोडल्या जातनाही. त्यामुळे प्रवाशी आणि विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात मानसिकत्रास सहन करावा लागत आहे.२ जुलै रोजी सकाळी ६ वाजता सुटणारी चांडोळ ही बस चालक हजर नसल्यानेपयार्यी चालक बस घेवून ७ ते ७.१५ वाजता निघाली मात्र या बसमध्ये प्रवाशीनव्हते. तर मढ मार्गे धाड आणि जामठी मार्गे धाड बस आज ५ जुलै रोजी गेलीचनाही. या दोन बसेस शाळांना सुट्टी असलेल्या दिवशी जात नसल्याने सकाळीतेथून येणाऱ्या प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो. तसेच बसस्थानकावरसीसीटीव्ही कॅमेरे नसल्याने चोऱ्यांचे प्रमाण वाढले असून, चिडीमारीचेप्रकारही वाढले आहेत. सोयगाव आगाराची अकोला-सोयगाव ही बस सायंकाळी ६.१५वाजता जाते. त्यामुळे प्रवाशी निघून जातात परिणामी सायंकाळी ६.३० वाजतामुक्कामी जाणारी बुलडाणा-अजिंठा गाडीला प्रवाशी मिळत नसून अर्निंग सुध्दामिळत नाही. त्यामुळे मुक्कामी जाणारी बुलडाणा-अजिंठा या गाडीची वेळबदलवून ती सायंकाळी ७.३० ते ८ वाजता करावी जेणेकरुन प्रवाशांना सोयीचेहोईल, अशी प्रवाशी वर्गाकडून मागणी होत आहे.
ग्रामीण भागात बसेस वेळेवर सोडाव्यात
By admin | Published: July 09, 2017 2:12 PM