त्या वेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी ही बाब स्पष्ट केली. सोबतच यापूर्वीही आपण याबाबत स्पष्टता केली असल्याचे ते म्हणाले. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. दरम्यान, २०२४ मध्ये राज्यात काँग्रेस पक्ष हा सर्वात मोठा पक्ष असल्याचे भाकीतही त्यांनी केले. या वेळी त्यांच्या समवेत काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे, विधान परिषदेचे सदस्य वजाहद मिर्झा, महाराष्ट्र प्रदेशचे उपाध्यक्ष नाना गावंडे, किसन सेलचे प्रदेशाध्यक्ष देवानंद पवार, कार्याध्यक्ष कुणाल पाटील (धुळे) यांच्यासह जिल्ह्यातील स्थानिक नेते उपस्थित होते.
वेळेवर भूमिका घेण्यापेक्षा आधीच आपली भूमिका स्पष्ट केलेली असणे याेग्य आहे. वेळेवर पाठीत खंजीर खुपसणे योग्य नाही, असे ते म्हणाले. आघाडी सरकारमध्ये आम्ही असलो तरी आम्ही आमची भूमिका स्पष्ट केलेली आहे. बऱ्याच ठिकाणी त्यासंदर्भाने आम्ही चाचपणी करण्यास प्रारंभ केला असल्याचे ते म्हणाले.
या वेळी बोलताना केंद्र सरकावर त्यांनी सडकून टीका केली. भाजप प्रचारजीवी असल्याचे ते म्हणाले, केंद्रातील भाजपच्या सरकारमुळेच दुसऱ्या लाटेत कोरोनामुळे अनेकांचे जीव गेले आहेत. देशातील लोकशाहीची प्रक्रियाच नष्ट करण्याचा प्रयत्न भाजपकडून होत असल्याचे ते म्हणाले. या वेळी त्यांनी मराठा आरक्षण, ओबीसी प्रश्नासह विविध मुद्द्यांवरील प्रश्नांना उत्तरे दिली.
--हमीभाव उशिरा जाहीर--
केंद्र सरकारने हमीभाव उशिरा जाहीर केला. त्यात स्पष्टता नाही. शेतीचा खर्च वाढला आहे. त्यामुळे केंद्र सरकारने सुधारित हमीभाव जाहीर करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.