बुलडाणा: कोरोना महामारीत प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी लिंबू, संत्री, मोंसबी प्रभावी ठरतेय. त्यामुळे या तिन्ही रसवर्गीय फळाच्या किंमतीत कमालिची वाढ झाल्याचे दिसून येते. बाजारात लिंबूचे भाव तर गगनाला भिडत असल्याचे चित्र आहे.
सी- जीवनसत्त्व असणाºया लिंबाचा खाद्यपदार्थासह औषधांसाठी वापर होतो. कोरोनासह इतर अनेक आजार रोखण्यासाठी लिंबू आरोग्यवर्धक आहे. त्याचप्रमाणे रसवर्गीय असलेली संत्री आणि मोसंबीही कोरोना काळात भाव खात आहे.
कोरोना विषाणू संसर्गापासून बचाव करण्यासाठी व प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठीदेखील लिंबू, संत्री आणि मोंसबीचा वापर वाढला आहे. मागणीपेक्षा पुरवठा कमी झाल्याने उपरोक्त तिन्ही फळांचे दर गगनाला भिडल्याचे दिसून येते. दरम्यान, कोरोना आणि उन्हाळ्यामुळे लिंबाची वाढती मागणी पाहता व आवक घटल्याने दरात वाढ झाली आहे. उन्हाळा संपेपर्यंत तरी लिंबाचे दर असेच चढे राहतील, असा अंदाज व्यक्त होत आहे.
चौकट...
५० टक्क्यांनी वाढले दर!
बुलडाणा जिल्ह्यात नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यात कोरोनाचा प्रकोप कमी होता. तसेच त्यावेळी हिवाळ्यामुळे लिंबू, संत्री आणि मोसंबी या रसवर्गीय फळांचा फारसा उठाव होत नव्हता. जानेवारीतही हीच परिस्थिती कायम होती. मात्र, फेब्रुवारीच्या मध्यानंतर कोरोनाचा प्रकोप वाढला. आता मार्च, एप्रिलमध्ये कडक उन्हाला सुरूवात झाल्याने लिंबू, संत्री, मोसंबी या फळांचे दर ५० टक्यांनी वाढलेत.
चौकट...
मोसंबी जालन्यातून, संत्री नागपूर-मध्य प्रदेशातून तर लिंबू श्रीगोंद्यातून
बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद आणि संग्रामपूर तालुक्यात संत्र्याचे उत्पादन घेतले जाते. मात्र, मागणीपेक्षा उत्पादन कमी असल्याने नागपूर आणि मध्य प्रदेशातील संत्री बुलडाणा जिल्ह्यातील प्रमुख बाजारपेठेत दाखल होतात. तर मोंसबी ही जालना जिल्ह्यातून येते. त्याचवेळी लिंबू श्रीगोंदा, अहमदनगर येथून जिल्ह्यात येतात.
प्रतिकिलो दर जानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिल
लिंबू ३० ४५ ७० ९०
मोसंबी ४० ५० ५५ ७०
संत्री २५ ३० ४५ ६०
कोट....
्रप्राचीन काळापासून लिंबूचा वापर करण्याची प्रथा आहे. थकवा आणि कंटाळा घालविण्यासाठी लिंबू, संत्री आणि मोसंबीचा उपयोग होतो. त्वचा, केस तसेच संपूर्ण आरोग्यासाठी ही फळे लाभदायी आहेत.
-पूजा तेरेदेसाई, आहार तज्ज्ञ
कोट...
संत्रा आणि लिंबात व्हिटामीन सी, व्हिटामीन ए, कॅल्शीयम, फायबर्स आणि मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असते. रोग प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी ही फळे लाभदायी आहेत. कॅलरी कमी असल्याने वजन नियंत्रित ठेवण्यासाठी त्यांची मदत होते.
-डॉ. कालिदास थानवी
---
इम्यनिटी वाढते! मी फळ खातो तुम्हीही खा!!
्नरोग प्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी क जीवनसत्व असलेल्या फळांची मदत होते. गत काही दिवसांपासून लिंबू, संत्री आणि मोसंबीचा वापर आहारात करीत आहे.
- प्रभावती चिम, मलकापूर
लिंबू, संत्री आणि मोसंबीसोबतच सर्वच प्रकारच्या फळांचे दररोज सेवन करणे फायद्याचे आहे. नियमित आहारासोबतच फळ आणि मोड आलेल्या कडधान्याचा आहारात फळांचा समावेश करावा.
- राजेंद्र कोल्हे, खामगाव.